Header Ads

१४ जुन रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

mns blood donation camp - janta parishad


मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्त कारंजा येथे 

१४ जुन रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन 

कारंजा (जनता परिषद) दि.११ - आजमितीला कोरोना रोगाच्या महामारीचे काळात रुग्णांचे उपचारार्थ सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासू शकतो, या पार्श्‍वभूमीवर आपलेही योगदान म्हणून विविध सामाजीक संघटन हे रक्तदान शिबीरांचे आयोजन करीत आहेत. याच उदात्त हेतूने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून  दि.१४ जुन रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानीक गुरुकृपा हॉटेल मागील पोले पाटील कॉम्प्लेक्स येथे हे रक्तदान दि.१४ जुन रोजी सकाळी १०.०० ते ०३.०० या दरम्यान होणार आहे.
कोरोनाच्या या संकटकाळात रक्तदान करुन आपले रक्त देश सेवेला लावूया, या ब्रिद सह रक्तदान करण्यास समोर यावे, असे आवाहन आयोजकांनी केेले आहे. रक्तदानासाठी अनुप ठाकरे, अरविंद भगत, अमोल धाने, रवि मुळतकर, मनिष राठोड, मानिक राठोड, नितीन तायडे, तुकाराम भडके, गौरांग देशमुख, सत्येंद्र बंदीवान यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

No comments

Powered by Blogger.