Header Ads

२४/०६/२०२० वाशिम : आज २ पॉझिटिव्ह : ८१ पैकी ५२ बरे होऊन घरी परतले

२४/०६/२०२० वाशिम : आज २ पॉझिटिव्ह 

जिल्हाची वाटचाल शंभरीकडे : 

८१ पैकी ५२ बरे होऊन घरी परतले 

वाशिम (जनता परिषद) दि.२४ - आज जिल्हा प्रशासनाने सायंकाळी ५.०० वाजता दिलेल्या माहितीनुसार, एकुण ३ व्यक्तींचे कोरोना चाचणी विषयक अहवाल प्राप्त झाले असून यांतील २ हे पॉझिटिव्ह  तर उर्वरित १ हे निगेटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील आजपर्यंतचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा ८३ वर पोहोचला आहे. विशेेष म्हणजे यांतील ५२ हे बरे झाले असून त्यांना डिस्जार्च देण्यात आलेला आहे. 
आज प्राप्त अहवालात, मानोरा येथील पती-पत्नी वय अनुक्रमे ३७ व ३२ वर्षे हे पॉझिटिव्ह आले असून हे दोघेही दिग्रस जि.यवतमाळ येथील बाधीतांच्या संपर्कात आले होते. दरम्यान अद्याप ९३ चाचणी विषयक अहवाल हे प्रलंबीत आहेत. 
आज कारंजा येथील चार जणांना डिस्जार्च देण्यात आला आहे. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.