Header Ads

कारंजा तालुक्यातील ग्राम वापटी कुपटी येथील इसम पुला वरुन वाहून गेेलेे

कारंजा तालुक्यातील ग्राम वापटी कुपटी येथील इसम पुला वरुन वाहून गेेलेे 

१ किलो मिटर अंतरावर दुचाकी आढळली; उद्या पुन्हा शोध मोहीम राबविणार 

सास, ग्रामस्थ, ५ गावांचे पोलिस पाटील, ग्रामपंचायत, आपातकालीन टिम ने राबविली शोध मोहिम 

नागरिकांनी पाऊस सुरु असेल तर रोड वरील पुलावरुन प्रवास टाळावा - सासचे प्रमुख श्याम सवाई

कारंजा (प्रति.) दि.१३ - तालुक्यातील ग्राम वापटी कुपटी येथील एक इसम पुलावरुन वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत असून सदरहू व्यक्तीची दुचाकी ही एक किलोमिटर दुरवर खोलीकरणात सापडली असल्याने ही भिती बळावली आहे. गाळ मोठ्या प्रमाणावर असल्याने तसेच या पात्रात झाडे व झुडपेही भरपूर असल्याने शोध मोहीम मध्ये अडचणी येत आहेत. तर सदरहू व्यक्ती न भेटल्याने उद्या पुन्हा शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. 
याबाबत, पुर्ण माहिती अशी की, तालुक्यातील ग्राम वापटी-कुपटी येथील रहिवासी बाबुलाल खडसे हे दि. १२ जुन २०२० रोजी आपले टेलरिंगचे काम आटोपून भूलोडा मार्गे वापटी-कुपटी कडे निघाले होते. मात्र यावेळी जोराने पाऊस सुरु होता तसेच मार्गावरील पुलावरुन पाणी जास्त असल्याने व त्याचा अंदाज आला नसल्याने दुचाकी घसरुन ते व दुचाकी दोन्ही पाण्याचे प्रवाहात वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत होेती. 
याची माहिती होताच ग्रामस्थ, पोलिस प्रशासन, महसुल प्रशासन शोध मोहिमेत लागलेत. याबाबत सर्वधर्म आपातकालीन संस्थेचे (सास) प्रमुख शाम सवाई यांना माहिती दिली असता, त्यांनी तात्काळ सासचे पथक सकाळी १०.०० वाजताच घटनास्थळाकडे रवाना केले. यावेळी राबविणेत आलेले शोध मोहिमेत पुलापासून १ किलोमीटर अंतरावर खोलीकरणात त्यांची दुचाकी (MH 37 R 8117) आढळून आली. मात्र सायंकाळी ५.३० वाजे पर्यंत खडसे यांचा पत्ता लागला नाही. या भागात गाळ खुप मोठ्या प्रमाणावर असून तसेच भुलोडा ते अंबोडा पर्यंत झुडुपांही मोठ्या संख्येने असल्या कारणाने शोध मोहिमेत अडचणी जात आहेत. यामुळे आता ग्रामस्थ व सर्वच टिम ह्या उद्या पुन्हा शोध घेणार आहेत. 
या शोध मोहिमेत समाजसेवक बंडुभाऊ इंगोल यांचेसह कामरगांव पोलिस चौकी प्रमुख पीएसआय मस्के यांचे नेतृत्वात चंद्रकांत डोळस (भुलोडा), मुद्दे (ब्राम्हणवाडा), भगत(औरंगपुर) ,मोरे (कामठा) व बेलखेडचे पोलिस पाटील तसेच वापटी येथील वारीअर्स ऑफ अशोका टिम चे सदस्य, ग्रामपंचायत वापटी-कुपटी चे सरपंच हरीष बलंग यांनी ही शोध मोहिम राबविली. सास टिमचे शाम सवाई, सदस्य जलपटु विजय भिसे, अरबाज गोचीवाले, अमीर चौधरी, उस्मान गुंगीवाले यांनी ही शोध घेतला.

नागरिकांनी पाऊस सुरु असेल तर रोड वरील पुलावरुन प्रवास टाळावा - सासचे प्रमुख श्याम सवाई

आज रोजी पुलावरुन जातांना वापटी-कुपटी येथील बाबुलाल खडसे हे दुचाकी चालवित असतांना पुलावर असलेले पाण्याचा अंदाज न आल्याने वाहुन गेलेची घटना घडली.
ग्रामीण भागातील रोड वरील पुलांची उंची ही फार कमी असते व यावरुन ४-५ फुट किंवा त्यापेक्षाही जास्त पाणी वाहत असते. अश्यावेळी दुचाकी स्वाराना वाटते की आपण आपली गाडी सहजगत्या काढू शकतो, मात्र पाण्याचा अंदाज येत नाही. पुलावर पाण्या-पावसामुळे झुडुप व गाळ आलेला असतो याचा अंदाजच येत नाही. अशावेळी जर कां गाडी पुलावरुन टाकली तर गाडी घसरते व एकदा गाडी ने तोल सोडला कि पाण्याचा प्रवाह हा वाहूनच नेतो. या व अशा घटना अनेकदा घडल्या आहेत.
गत वर्षी ग्राम अंबोडा येथे पाण्यात वाहून गेल्यामुळे एका महिलेचे मृतदेह हे जवळपास २० किलोमिटर अंतरावर भेटले होते. तर ४-५ वर्षापुर्वीच्या एका घटनेत ग्राम चांदई येथे एक इसम वाहनू गेल्याने त्यांची ६ दिवस शोध मोहिम घेण्यात आली. मात्र त्यांचा पत्ताच लागला नव्हता. त्यामुळे वाहन चालकांनी सावध राहावे व पुलावरुन पाणी असतांना प्रवास टाळावा, असे आवाहन सासचे प्रमुख शाम सवाई यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.