Header Ads

३० जुन : अकोला येथे आज संध्याकाळी मालेगांव येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह

३० जुन : अकोला येथे आज संध्याकाळी मालेगांव येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह

मालेगांव (जनता परिषद - प्रतिनिधी) दि.३० - आज संध्याकाळी अकोला येथून प्राप्त माहिती नुसार, मालेगांव जि.वाशिम येथील एक व्यक्तीचा कोरोना विषयक चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. 
प्राप्त माहितीनुसार, सदरहू व्यक्ती हा अकोला फाटा येथील रहिवासी असल्याचे कळते. या इसमाला न्यूमोनीया चे लक्षण आढळून आल्याने एका स्थानीक डॉक्टरने तज्ञ डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर ही व्यक्ती अकोला येथे पुढील उपचारार्थ गेली. मालेगांव तहसील, नगर पंचायत प्रशासन हे संबंधीत व्यक्ती व त्यांचे संपर्कात आलेल्या व्यक्तींबाबत अधिक माहिती घेत असून पुढील कारवाई करीत आहे. 
दरम्यान, नागरिकांनी मास्क लावावे, सोशियल डिस्टेंसिंगचे पालन करावे तसेच अनावश्यक फिरु नये तसेच गर्दी करु नये असे आवाहन प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.