Header Ads

गरीबांना मदत करुन साजरी करा ' रमजान ईद '

गरीबांना मदत करुन साजरी करा ' रमजान ईद ' 

टिपू सुलतान सेना चे जिल्हाध्यक्ष अब्दुल राजिक शेख यांचे आवाहन 

     कारंजा दि.17 -  मागील 54 दिवसांपासून कोरोना मुळे लाॅकडाउन चालू आहे. ह्यामुळे रोज मेहनतीने पैसे कमवून आपल्या परिवाराचा उदर निर्वाह करणार्यांच्या समोर भुकबळी ची समस्या निर्माण झाली आहे. अश्या विपरीत परिस्थितीत गरीब,  मजूरवर्ग व गरजू लोकांच्या प्रति सहानुभूती दाखवत आपलं कर्तव्य पार पाडत पवित्र रमजान ईद गोरगरीब व गरजवंताना मदत करुन साजरी करण्याचे आवाहन वाशिम जिला टिपू सुलतान सेना चे जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अब्दुल राजिक शेख ह्यांनी आपल्या मुस्लीम समाजातील सर्व बांधवांना केले आहे.
       गोरगरीबांसह मजूरवर्गा समोर आज उपासमारीची पाळी आली आहे. हाताची कामे पूर्ण बंद असल्याने जीवन कसे जगावे असा प्रश्न कामगारांना पडला आहे रमजान ईद म्हणजे मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा व आनंदाचा क्षण. म्हणुनच प्रत्येक मुस्लिम बांधवांनी गोरगरीब जनता, मजूरवर्ग ह्यांच्या सह सर्व नागरिकांना आपल्या आनंदात सहभागी करून ह्यावेळी ची ईद साजरी करावी
       आज हाताला काम नसल्यामुळे प्रत्येक होतकरू वर्गाची आथिर्क परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या खानापिण्याची एक दिवसाची ही सोय होत नाही आहे , जरूरी सामान चा अभाव आहे एवढेच नव्हे तर आतापर्यंत मेहनतीने कमावलेले पैसे संपत आले आहे अशीच परिस्थिती दोन तीन महिने राहीली तर भविष्यात गोरगरीब जनतेला पोट भरणे कठीण होणार आहे आणि ही परिस्थिती आणखी किती दिवस चालणार आहे ह्माचा ही काही नेम नाही त्यामुळे अश्या दुःखा च्या प्रसंगी रमजान ईद निमित्त नवीन कपडे, जोडे व चप्पला तसेच मिठान्न खरेदी करने उचित ठरणार नाही
      रोजमजुरीसह लहान मोठे व्यवसाय ही ठप्प झाल्याने गोरगरिबांना सकस सात्त्विक आहार व चांगले कपडे, चप्पला जोडे व मिष्ठान्न पासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे ह्यावर्षी ईद साजरी करीत असताना कोणत्याही प्रकारची नवीन खरेदी न करता त्या बचत झालेल्या रकमेतून गोरगरिबांना व गरजू लोकांना पैसा च्या माध्यमातून अथवा अन्न धान्याच्या किंवा उपयुक्त वस्तू च्या स्वरुपात मदत करावी असे आवाहन अब्दुल राजिक शेख यांनी केले आहे.
         आमचा प्रयत्न हा राहील की प्रत्येक मुस्लिम संघटना व व्यक्तिशः मुस्लिम व्यक्ती प्रत्येक एका गरीब कुटुंबाला ईद च्या पवित्र दिवशी उपयुक्त साधन सामुग्री व अन्न धान्याच्या किट्स चे वाटप करून त्यांच्या जीवनात आनंदाचे व सुख समृद्धी तसेच समाधानकारक वातावरण निर्मीती होईल आणि ही शिकवण व संदेश हजरत मुहम्मद पैगंबर स. स ह्यांनी समस्त मानव कल्याणाकरीता दिला आहे
      हजरत मुहम्मद पैगंबर स.स ह्यांची शिकवण आचरणात आणून प्रत्येक मुस्लिम व्यक्ती नी शहरात कोणताही गोरगरीब जनता, शेतकरी , मजूरवर्ग कमीतकमी ईद च्या पवित्र दिवशी तरी उपाशी पोटी रहाणार नाही आणि रमजान महिन्यात जकात , सत्काद , फित्रा च्या माध्यमातून मुस्लिम आदिवासी , दलित , आत्महत्या ग्रस्त शेतकरी परिवार, पिछडा, शोषित एंव वंचित समाजालाही मदत केली तर हजरत मुहम्मद पैगंबर स स ह्यांनी समस्त मानवजातीच्या कल्याणाकरीता सांगितलेल्या मार्गानेच स्वर्गाची दारे उघडण्याचे आवाहन केले आहे.

No comments

Powered by Blogger.