Header Ads

कि.न.गो. महाविद्यालयाकडून सीएम रिलीफ फंडात 65 हजाराची मदत

Janta Parishad Karanja Lad Dist Washim Newspaper

कि.न.गो. महाविद्यालयाकडून सीएम रिलीफ फंडात 65 हजाराची मदत

प्राचार्य, प्राध्यापक सह शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी दिले १ दिवसाचे वेतन 



   कारंजा दि. 16 - दि.बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी,अकोला द्वारा संचालित किसनलाल नथमल गोयनका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय कोडापे तसेच वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 या खात्यामध्ये ६५ हजार ६१ रुपये धनादेशाच्या स्वरूपात तहसीलदार धीरज मांजरे यांना दिले आहे. 
        कोरोना या जागतीक महामारीचा सामना संपूर्ण देशांसह महाराष्ट्र करत असतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेला केलेल्या आर्थिक मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील किसनलाल नथमल गोयनका महाविद्यालयाच्या वतीने ही मदत करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या रुपाने देशावर मोठे संकट कोसळले आहे. या संकटाचा सामना शासन व प्रशासनातील सर्व घटक अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांवर उपचार करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत.अशा कठीण प्रसंगी देशाला आर्थीक मदतीची गरज असून, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुध्दा राज्यातील नागरीकांना सीएम रिलीफ फंडात आपले योगदान देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून, समाजातील सर्व घटक आपआपल्या परीने आर्थिक मदत देत आहेत. 
     तसेच महाराष्ट्रातील अनेक बांधव आपआपल्या परीने आर्थिक, अन्नदान व इतर स्वरुपात मदत देण्यासाठी पुढे येत असून, संकटकाळी देश वाचविण्यासाठी मदतीसाठी पुढे येत आहेत. या मदतीचे धनादेश देतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय कोडापे,प्रा.जमील शेकूवाले, प्रा.सुरज टीलावत यांची उपस्थिती होती. तसेच मदत करणाऱ्या सर्व प्राध्यापकांसह कर्मचाऱ्यांचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी पत्र देऊन आभार मानले.


K.N. College Karanja Donates Rs. 65,000 to the CM Relief Fund

1-day salary paid by the principal, professor, and non-teaching staff


     Karanja (Janta Parishad) Date 16 - K.N.College has donated Rs. 65,000 to CM Relief Fund today. Dr. Vinay Kodape, Principal of Kisanlal Nathamal Goenka College run by Berar General Education Society, Akola as well as senior college professors and non-teaching staff paid one day's salary in the account of Chief Minister's Assistance Fund Kovid-19 to the Tehsildar. Dhiraj Manjre by Cheque. 
        Kisanlal Nathmal Goenka College in Maharashtra has responded to Chief Minister Uddhav Thackeray's call for financial assistance to the people as the country is facing the global epidemic of the corona. The Corona epidemic has wreaked havoc on the country. All elements of the government and administration are working day and night to face this crisis. Billions of rupees are being spent on the treatment of people suffering from this disease. The country needs financial help in such a difficult situation. Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray has also appealed to the citizens of the state to contribute to the CM Relief Fund. Responding to this call, all sections of the society are providing financial assistance in their own way.
     Also, many brothers and sisters in Maharashtra are coming forward to help in financial, food, and other forms, and to save the country in times of crisis. The principal of the college Dr. Vinay Kodape, Prof. Jamil Shekuwale, and Prof. Suraj Tilawat were present while handing over the cheques. Tehsildar Dheeraj Manjre also thanked all the professors and staff for their help.


No comments

Powered by Blogger.