Header Ads

काळजी घ्या, सुरक्षीत रहा, अनावश्यक फिरु नका

काळजी घ्या,  सुरक्षीत रहा,  अनावश्यक फिरु नका 

गाठ मृत्यूशी आहे : काळजी घ्या !

वाशिमचे जिल्हा पोलिस अधिक्षक मा.श्री.वसंतजी परदेशी यांचे ध्वनीफित द्वारे नागरिकांना आवाहन 

प्रतिष्ठाणे, दुकानदार, गिर्‍हाईकांनाही केले आवाहन



वाशिम (जनता परिषद) दि.०७ - वाशिम जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक मा.श्री.वसंतजी परदेशी यांनी एका ध्वनीफित द्वारे नागरिकांना अनावश्यक बाहेर येवू नये, गाठ मृत्यूशी आहे असे आर्त आवाहन केले आहे. 
नागरिक अजिबात सिरीयस नसून, विनाकारण बाहेर पडत आहेत. अजूनही कर्फ्यु सुरुच असून नागरिकांना त्यांचे व्यवहार करता यावेत यासाठी काही वेळेचे बंधन टाकून वेळ वाढवून देण्यात आलेली आहे. मात्र दुकानदारांनी खुप काळजी घेणे गरजेचे असून मास्क लावणे हे कंपल्सरी आहे. तसेच गिर्‍हाईकांनीही आवश्यक सर्व काळजी घेणे, मास्क लावणे गरजेचे आहे. ६ फुटाचे अंतर हे दुकानदारांसाठी बंधनकारक आहे. आजच नाही तर भविष्यातही याचे संसर्ग टाळणेसाठी अंतर राखणे हे आता जरुरी झाले आहे. 
सर्वांनी काळजी घ्या, बाहेर येऊ नका, पिकनीक सारखे फिरु नका. नागरिक अशी गर्दी करताहेत जसे काही सर्व हे फ्री झाले आहे, असे करु नका. आतापर्यंत आपण ग्रीन झोन मध्ये आहोत व तसेच राहणेसाठी स्वयंशिस्त बाळगणे गरजेचे आहे. नागरिकांनी विनकारण फिरु नये. अन्यथा गुन्हे दाखल होतील, वाहने जप्त होतील. त्यामुळे स्वयंशिस्त पाळा असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक वाशिम यांनी केली आहे. 
सर्वजण आजमितीला टिव्ही द्वारे केसेस वाढतच आहेत हे पाहतच आहात. मोठ्या संख्येत हे पेशंट वाढतच आहेत. गरीब, श्रीमंत असा कोणताच भेद राहीलेला नसून हे सर्वांनाच त्रासदायक आहे. ज्याची प्रतिकारक शक्ती चांगली तो चालेल परंतू ज्याची रोग प्रतिकारक शक्ती कमी त्याला खुपच त्रासदायक अशी वेळ आहे. आपले जर कां बरे वाईट झाले तर आपले पश्‍चात आपल्या कुटुंबाचे काय होईल याचा विचार करावा. नागरिक छोट्या गोष्टीसाठी बाहेर येताहेत व काहीही कारणे पोलिसांना सांगताहेत, असे करुन आपण आपलीच फसगत करुन घेत आहात, हे लक्ष्यात ठेवणे गरजेचे आहे. जर कां बाहेर जाणे अत्यावश्यकच असेल तर आल्यावर कपडे बदला, डेटॉलने धुवा, आंघोळ करा, शक्य ती काळजी घ्या. असेही त्यांनी आपले संदेशात म्हटले आहे. 
आपण टिव्ही वर रोजच मृत्यू वाढताहेत हे बघतोय. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी महामारी असून यासाठी स्वयंशिस्त चे पालन हेच उपाय आहे. शिस्त बाळगली नाही तर आपल्या नाशाला आपणच कारणीभूत ठरु ह्याची प्रत्येकाने जाण ठेवावी. काळजी घेतली तर कोरोनाला हरविता येणार आहे, नाहीतर माणसं जगू शकणार नाही. घरात कोणीच शिल्लक राहणार नाही. बिल्डींग कितीही मोठी असली, बिझनेस कितीही मोठा असला तरी काहीच कामी येणार नाही. 
गाठ ही मृत्यूशी आहे, स्वत:ला जपा, आपले कुटुंबाला जगा, सहकार्‍यांची काळजी घ्या आणि सर्वांनी सुरक्षीत राहा असे आवाहन वाशिमचे जिल्हा पोलिस अधिक्षक मा.वसंतजी परदेशी यांनी केले आहे. 

No comments

Powered by Blogger.