Header Ads

भारतीय जैन संघटना वाशीम व फोर्स मोटारचे स्तुत्य उपक्रम

 डॉक्टर आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत पाच हजार रूग्णांची तपासणी

भारतीय जैन संघटना वाशीम व फोर्स मोटारचे स्तुत्य उपक्रम 

सावंगा जहागिर, दगडउमरा, काकडदाती येथे उत्स्फुर्त प्रतिसाद


     वाशीम (का.प्र.) दि. 06 - सामाजिक कार्यात अग्रसेर असलेल्या भारतीय जैन संघटना वाशीम व फोर्स मोटारच्या वतीने वाशीम जिल्हयात लॉकडाउनच्या काळात जनतेच्या आरोग्याची काळजी घेत डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम संयोजक शिखरचंद बागरेचा व सहसंयोजक जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. आतापर्यंत या उपक्रमाअंतर्गत पाच हजार लोकांची तपासणी करून त्यांना औषधीचे मोफत वितरण करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात येत असून पुणे वगळता संपूर्ण राज्यात वाशीम जिल्हा अग्रेसर ठरला आहे.
   वाशीम तालुक्यातील ग्राम सावंगा जहागिर येथे वसुंधरा टेक्नीकल इंस्टिटयुटच्या अध्यक्षा डॉ. सौ. सरोज बाहेती व बालरोग तज्ञ डॉ. हरिष बाहेती यांच्या सहकार्याने डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम 4 मे रोजी घेण्यात आला. डॉक्टर बाहेती दाम्पत्याने याकरीता औषधाची व्यवस्था केली होती. या ठिकाणी 300 हून अधिक लोकांची तपासणी करून मोफत औषधीचे वितरण करण्यात आले. 5 मे रोजी काकडदाती, दगडउमरा आदि ग्रामीण भागातही सेवा प्रदान करण्यात आली. सदर उपक्रमात डॉ. सुजाता भगत व डॉक्टर नितीन व्यवहारे हे लोकांची आरोग्य तपासणी करीत आहेत. स्वयंसेवक म्हणून चालक पांडूरंग सरनाईक, संजीव भांदुर्गे, रविंद्र पेंढारकर, सुनिल दिग्रसकर आदिं सेवा देत आहेत. सदर उपक्रमामुळे मोठा दिलासा उपलब्ध झाला असून लोकांची आरोग्याची काळजी या उपक्रमामार्फत भारतीय जैन संघटना घेत आहे. 

No comments

Powered by Blogger.