Header Ads

वाशिम जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक मा.श्री.वसंतजी परदेशी यांचे अधिकारी व कर्मचार्‍याना आवाहन

वाशिम जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक मा.श्री.वसंतजी परदेशी यांचे अधिकारी व कर्मचार्‍याना आवाहन 

काळजी घ्या, मास्क वापरा, अंतर पाळा 



     वाशिम (जनता परिषद) दि. ०७ - वाशिम जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक मा.श्री.वसंतजी परदेशी यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना एका ध्वनीफित द्वारे सुचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सर्वांनी वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन गांभीर्याने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्मचार्‍यांनी फेसमास्क लावणे अत्यंत गरजेेचे आहे. चेकींग करतांना लोकांपासून दुर रहा, जवळ जाऊ नका, विनाकारण गाडीला हात लावू नका, अंतर ठेवा असे आवाहन त्यांनी केले आहे. वारंवार सांगूनही काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते आहे. अजूपर्यंत तरी आपले कडे एकही पेशंट नाही. एक ट्रक हा पंक्चर साठी थांबतो व त्याचा क्लिनर पॉजिटिव्ह मिळतो व मरण पावतो. तसेच कारंजा येथे एका डॉक्टर कडे आलेला नेर येथील पेशंटचा रिपोर्ट हा  पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नेमके पॉझिटिव्ह कोण व निगेटिव्ह कोण हे सांगणे कठीण आहे. तरी सर्वांनी काळजी घ्या. 
अधिकारी व कर्मचारी जेव्हा घरी जातात तेव्हा मुद्दामहून कुटुंबीयांपासून दुर रहा. आंघोळ करा, दररोज कपडे बदला, कपडे धुवा आणि शक्य असेल तर वेगळ्या रुम मध्ये रहा. सॅनीटाईज केल्या शिवाय कोठेही स्पर्श करु नका. 
एक पोलिस म्हणून कामावर जाणे आवश्यकच आहे. एमरजेंसी ची वेळ आहे, मदत करण्याची वेळ आहे. तरी काळजी घ्या. स्वत: सुरक्षीत रहा जेणे करुन इतरांची मदत करता येईल. व्यवस्थित इमानदारीने काम करा. विनाकारण कोणाला त्रास देऊ नका. परिस्थिती अत्यंत वाईट आहे. लोकांचे धंदे नाहीत, काम नाही, खायला नाही अशावेळी आपले द्वारे माणूसकीचे दर्शन होणे गरजेचे आहे. 
काळजी घ्या, सुरक्षीत रहा, अंतर ठेवा असे आवाहन त्यांनी या ध्वनीफित द्वारे केले आहे. 

No comments

Powered by Blogger.