Header Ads

नियमित पाणी पुरवठयाच्या मागणी करिता निवेदन सादर


नियमित पाणी पुरवठयाच्या मागणी करिता निवेदन सादर

सामाजिक अंतर राखत दिले निवेदन

काही मागण्या मान्य; काहींचा पाठपुरावा करणार


     कारंजा (का.प्र.) दि. 06 - स्थानिक गौतम नगर, शांती नगर मधे मागील एक ते दोन महिण्यांपासुन पाणीटंचाई ची समस्या निर्माण झाली आहे.अडान प्रकल्पा मधे मुबलक जलसाठा असताना सुद्धा पाणीपुरवठा बरोबर होत नसल्याने कुणाचे नळाला पाणी यायचे तर कुणाचे नळाला बिलकुल येत नव्हते. अगोदरच देश कोरोना मुळे त्रस्त झाला त्यात देशभरात लॉकडाऊन लागले पण आमच्या पुढे दुहेरी संकट निर्माण झाले होते रात्रभर जागुन सुध्दा पाणी मिळत नाही.यामुळे अखेर लॉकडाऊन शिथिल झाल्यावर 6 मे 20 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र जिवन प्राधिकरण सहायक कार्यकारी अभियंता यांना फिजिकल डिस्टंन्स चे पालन करून निवेदन देण्यात आले.
      यावेळी पाण्याच्या समस्ये बद्दल मागण्या करण्यात आल्या होत्या आणी जर आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही व मागण्या मान्य न केल्यास परिसरातील नागरिक हे तिव्र आंदोलन करतील असा इशारा सुद्धा यावेळी सदर निवेदनातुन देण्यात आला आहे.सदर निवेदन दिल्यानतर सहायक कार्यकारी अभियंता व शाखा अधिकारी यांच्या सोबत सविस्तर चर्चा करण्यात केली असता सहायक कार्यकारी अभियंता व शाखा अधिकारी यांनी बहूतांश मागण्या मान्य केल्या आहेत व काही मागण्या वरिष्ठाकडे पाठवुन योग्य पाठपुरावा करू असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.सामाजिक कार्यकर्ता सचिन खांडेकर, सागर राऊत, रूषिल भगत, सुरेश पाईकराव, निखिल सोनोने, अदिभ शेंडे, हर्षल पाटील, अक्षय भगत. इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.