Vardhapan Din

Vardhapan Din

ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास ‘फिव्हर क्लिनिक’


ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास

‘फिव्हर क्लिनिक’मध्ये तपासणी करून घ्या


जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांचे आवाहन 

प्रत्येक तालुक्यात एक ‘फिव्हर क्लिनिक’


वाशिम, दि. ०६ (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सहा स्वतंत्र ‘फिव्हर क्लिनिक’ सुरु करण्यात आली आहेत. ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास असलेल्या रुग्णांची याठिकाणी तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे असा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या नजीकच्या ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये जावून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. ताप, सर्दी व खोकला हे तसे नेहमीचे आजार आहेत, मात्र, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये सुद्धा अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींची तपासणी व उपचार करण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे सहा  ‘फिव्हर क्लिनिक’ सुरु करण्यात आली आहेत. ताप, सर्दी व खोकला आदी लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींची तपासणी, उपचार करण्यासोबतच त्यांच्या प्रवासाची नोंद सुद्धा ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांना ताप, सर्दी व खोकला असा त्रास आहे, त्यांनी उपचारासाठी इतर कुठेही न जाता आपल्या नजीकच्या ‘फिव्हर क्लिनिक’मध्येच येवून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.

येथे आहेत ‘फिव्हर क्लिनिक’

१)      वाशिम तालुका- आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, सिव्हील लाईन, वाशिम
२)     रिसोड तालुका- अनुसूचित जाती मुलांची निवासी शाळा, सवड
३)     मालेगाव तालुका- नवीन तहसील कार्यालय, मुख्य इमारत, मालेगाव
४)   मंगरूळपीर तालुका- अल्पसंख्याक वसतिगृह, मंगरूळपीर
५)    कारंजा लाड तालुका- एम.बी. आश्रम, मुर्तीजापूर रोड, झाशी राणी चौक जवळ, चंदनवाडी, कारंजा लाड
६)     मानोरा तालुका- औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), मानोरा
Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells