Header Ads

कोरोना संक्रमीत असलेली महिला, कुटुंबातील सहाही जणांसह जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती

काल व आज पाठविलेले ११ रिपोर्ट अद्यापपर्यंत अप्राप्त - जिल्हावासीयांचे लागले लक्ष्य 

कोरोना संक्रमीत असलेली महिला, कुटुंबातील सहाही जणांसह जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती 

मुंबई येथे मालेगांवकडे मार्गस्थ होणे पुर्वी केले होते टेस्ट; मार्गातच आले होते रिपोर्ट पोझिटिव्ह



वाशिम (जनता परिषद) दि.१६  - शुक्रवार दि.१५ मे रोजी ५ तर शनीवार दि.१६ मे रोजी ६ असे एकुण ११ जणांचे अकोला येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या थ्रोट स्वॅब तपसाणीचे रिपोर्ट काय येते याकडे समस्त जिल्हावासीयांचे लक्ष्य लागले आहे. अद्यापपर्यंत तरी हे निकाल आले नसून उद्या येण्याची शक्यता आहे. 
शुक्रवार दि.१५ मे रोजी ५ संशयीत रुग्णांचे थ्रोट स्वॅब हे तपासणीकरीता पाठविण्यात आले होते. ताप, खोकला आदी कोरोनासदृष्य लक्षणे दिसून आल्याने ह्या पाच जणांचे रिपोर्ट पाठविण्यात आले होते. यांत वाशिम येथील ३ तर कारंजा येथील २ जणांचा समावेश आहे. 
तर दुसरीकडे काल मुळचे मालेगांव येथील असलेल्या कुटुंबातील महिला ही कोरोना ने संक्रमीत असल्याचे आढळून आल्यामुळे त्या कुटुंबातील इतर ६ जणांचे घशांचे स्त्रावाचे नमुने हे तपासणीसाठी आज दि.१६ मे रोजी पाठविण्यात आले आहेत. 

कोरोना संक्रमीत असलेली महिला कुटुंबातील सहाही जणांसह जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती 

मुंबई येथे मालेगांवकडे मार्गस्थ होणे पुर्वी केले होते टेस्ट; मार्गातच आले रिपोर्ट 

काल दि. १५ मे रोजी रात्रौ ८.०० वाजता चे दरम्यान, मालेगांव येथील मुळचे असलेले व मुंबईहून परतत असलेले  मार्गस्थ कुटुंबातील एका महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. लॉक्डाऊनचे शिथीलता नंतर कामानिमित्त दुसरे गांवी व राज्यात गेलेले कुटुंबचे कुटुंब हे आपले मुळ गांवी परतत असल्याचे चित्र संपूर्ण देशातच दिसून येते आहे. याच अनुषंगाने मालेगांव येथील ७ सदस्यीय कुटुंब हे मुंबई येथून निघून मालेगांव कडे येण्यास सज्ज झाले. मात्र अशावेळी परिवारातील एका महिलेला कोरोना सदृष्य लक्षणे दिसून आल्याने त्यांनी मुंबई येथे याबाबत कोरोना चाचणी करवून घेतली. त्यांना रिपोर्ट मिळून जाईल तुम्ही तुमचे गावाकडे जाऊ शकता ही परवानगी मिळाल्यावर हे कुटुंब मालेगांवकडे निघाले. मात्र मार्गातच मेहकर येथे रिपोर्ट हा पॉझिटिव्ह असल्याचा संदेश प्राप्त झाला. अशावेळी न घाबरता पहिले मुंबईतच तपासणी करुन घेत आपल्या कर्तव्याची जाणीव असलेलेे ह्या परिवाराने सरळ वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. 
जिल्हा सामान्य रुग्णालयाने ह्या सर्व सातही जणांना अलगीकरणात (Isolation) मध्ये ठेवले असून त्यांचे घशांचे स्त्रावाचे नमुने तपासणी करीता आज रोजी पाठविले असून त्याचा निकाल हा उद्या अपेक्षीत आहे. 
या उदाहरणावरून नागरिकांनीही घाबरून न जाता कोण्या व्यक्तीला कोरोना सदृश्य लक्षण आढळून आल्यास त्याने व त्याचे परिवाराने स्वत: समोर येवून तपासणी करुन घ्यावी, हे रुग्णाच्याच सोयीचे आहे. याद्वारे रुग्ण व त्याचा परिवार रुग्णाची, परिवाराची, समाजाची तसेच संपूर्ण देशाची निगा राखण्याचेच कर्तव्य पार पाडेल.  
जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात गृह विलगीकरणात एकुण ५१, संस्थात्मक विलगीकरणात १७ तर अलगीकरणात (Isolation) १२ व्यक्ती असल्याची माहिती प्राप्त असून ११ अहवाल हे अप्राप्त आहेत. 


Washim: 11 reports yet to come

A woman infected with corona, along with six members of her family, was admitted to the district general hospital
The test was conducted before the route to Malegaon in Mumbai; The report was positive

       Washim (Janta Parishad) Date 16th - Friday 15th May 5 and Saturday 16th May 6, a total of a swab sample of 11 people were sent to Akola for examination. Reports are yet to come and most probably will come tomorrow. 
     Throat swabs of 5 suspected patients were sent for examination on Friday, May 15. The five were reported to have corona-like symptoms such as fever and cough. These include 3 from Washim and 2 from Karanja.
      On the other hand, as the woman of the family originally from Malegaon was found to be infected with corona yesterday, the throat secretion samples of 6 other members of the family were sent for examination on May 16.

A woman infected with corona was admitted to the district general hospital along with six members of her family

The test was conducted before the route to Malegaon in Mumbai; the report came on the way

     Yesterday On May 15, at around 8.00 pm, a woman from Malegaon, who was returning from Mumbai, was found to be suffering from Corona disease. After the relaxation of the lockdown, the picture is that the families who have gone to other Metro Cities for work and to the other state are returning to their native villages all over the country. In this connection, the 7 member family from Malegaon got ready to leave Mumbai and come to Malegaon. However, a woman in the family showed corona-like symptoms and took a corona test in Mumbai. They got confirmation that they will get the report on the way.  After getting permission that you can go to your village, the family left for Malegaon. But on the way, the message was received at Mehkar that the report was positive. Undaunted, the family rushed to the Washim District General Hospital after first checking in Mumbai and realizing their duty.
     The district general hospital has kept all the seven in isolation and sent their throat secretion samples for examination today and the result is expected tomorrow.
     It is in the best interest of the patient that he and his family should come forward and check for corona-like symptoms without fear of the citizens. Through this, the patient and his family will fulfill the duty of taking care of the patient, the family, the society as well as the entire country.
According to the information received by the District Information Office in the afternoon, there are a total of 51 persons home quarantine, 17 persons in institutional quarantine, and 12 persons in isolation in the district, and 11 reports are awaited. 

No comments

Powered by Blogger.