Header Ads

मजुरांसाठी पालकमंत्र्यांकडून वाहनाची व्यवस्था

वाशिमकडे पायी निघालेल्या मजुरांसाठी पालकमंत्र्यांकडून वाहनाची व्यवस्था

17 मजूरांना सातारा येथून वाशिम ला केले रवाना 

     वाशिम, दि. 21 : रत्नागिरी जिल्ह्यात मजुरीसाठी गेलेले वाशिम जिल्ह्यातील १७ मजूर पायी चालत वाशिमकडे निघाले होते. ते सातारा जिल्ह्याच्या हद्दीत पोहचले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी प्रशासनाला सूचना देवून या मजुरांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली. तसेच आज या सर्व मजुरांना खाजगी वाहन उपलब्ध करून देवून या मजूरांना वाशिमकडे रवाना करण्यात आले आहे. 

     वाशिम जिल्ह्यातील १७ मजूर पायी चालत वाशिमकडे निघाल्याची माहिती मिळताच पालकमंत्री श्री. देसाई यांनी तत्परतेने कार्यवाही करून सातारा जिल्हयातील उंब्रज येथे त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. त्यानुसार या सर्व १७ मजुरांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर या सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांचे रितसर प्रवासाचे पास काढून देवून या मजुरांना गावी जाण्यासाठी खाजगी वाहन उपलब्ध करून देण्यात आले. आज हे सर्व मंजूर वाशिमकडे रवाना झाले असून, राहण्याची, जेवणाची तसेच गावी जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था केल्याबद्दल वाशिमच्या या मजुरांनी पालकमंत्र्यांचे विशेष आभार मानले.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------


The Guardian Minister arranged transport for the laborers towards Washim on Foot

17 laborers were sent from Satara to Washim


     Washim, Date 21 - 17 laborers from Ratnagiri district started travelling towards Washim on foot. They reached the boundaries of Satara district. As soon as the Guardian Minister Shambhuraj Desai got information about this, he informed the administration and arranged accommodation and meals for the workers. Also, yesterday on 20th May all these laborers have been provided private vehicles and sent to Washim.

     Upon receiving the information that 17 laborers from Washim district went to Washim on foot, the Guardian Minister Shri. Desai took immediate action and instructed the administration to arrange for their stay and meals at Umbraj in Satara district. Accordingly, accommodation and meals were provided to all these 17 laborers. After checking the health of all these laborers, their formal travel passes were removed and private vehicles were provided to these laborers to go to the village. Today, all the sanctioned people have been sent to Washim. The workers of Washim thanked the Guardian Minister for arranging accommodation, meals and transport to reach their village.

No comments

Powered by Blogger.