अन्नपाण्यावाचून उपाशी राहिल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू
अन्नपाण्यावाचून उपाशी राहिल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू
बेलमंडळ येथील ६५ वर्षीय वृद्धेचे बसस्टॅण्ड वर गेले प्राण
कारंजा येथे नगर परिषद, ग्राम पंचायत व सासचे मदतीने करण्यात आले अंत्यसंस्कार
खेदजनक : परिसरातच आहे शिवभोजन चे एक काऊंटर
 कारंजा (जनता परिेषद) दि.२१ - चार दिवसांपासून अन्नपाण्याशिवाय असल्याने एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा कारंजा बसस्टँण्ड येथे मृत्यू झाल्याची हृदयविदारक अशी घटना आज सकाळी घडली. सर्व सोपस्कार नंतर तहसिलदार, मुख्याधिकारी, ठाणेदार, नगर परिषद, सदरहू महिला राहत असलेले बेलमंडळचे ग्राम पंचायत व सर्वात महत्वाचे सासचे उपस्थितीत कारंजाचे मोक्षधाम येथे महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 आज सकाळी कारंजा बसस्टॅण्ड येथे प्लॅटर्फार्म क्र.८ वर एक वृद्ध महिला मृतावस्थेत असल्याची माहिती सासचे सदस्य राजेश प्रभाकरराव गुंजाटे यांनी सास प्रमुख शाम सवाई यांना दिली. माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले.  व हि माहिती कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांना देण्यात आली. प्राथमिक माहितीन्वये सदरहू महिलेला तिच्या परिवाराचा कोणताच आधार नव्हता. शोध नंतर सदरहू ६५ वर्षीय ही महिला तालुक्यातील ग्राम बेलमंडळ येथील असून तिचे नाव कमला पांडुरंग मोडक असल्याचे समजले. वृद्ध महिला मृत्यू पावली असूनही कोरोनाच्या भितीने खुप वेळेपर्यंत कोणीही या महिलेचे प्रेताजवळ जाण्यास धजावले नव्हते. 
 सदरहू महिलेचे प्रेत तहसिलदार धिरज मांजरे, ठाणेदार सतीश पाटील, मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे, आरोग्य निरीक्षक विनय वानखडे व सास यांचे प्रयत्नांनी रुग्णवाहीके द्वारा उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले. 
 सवर्र् सोपस्कार झाल्यानंतर कारंजा येथील मोक्षधाम येथे सदरहू महिलेचे अंत्यसंस्कार करण्यात आले. महिलेला अग्नी तीचा मुलगा प्रकाश मोडक, पुरुषोत्तम मोडक, नातू रोहन मोडक यांनी दिला. यावेळी नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे, आरोग्य निरीक्षक विनय वानखडे, न.प. कर्मचारी, रुग्णवाहीका चालक सुमेद बागडे, ग्राम बेलमंडळ चे सरपंच सचीन एकनार, ग्रामसेवक सचीन राठोड, पोलिस पाटील गजानन वर, ग्राम रोजगार सेवक गजानन हिरोडे, कोतवाल गजानन वानखडे हे उपस्थित होते. 
सदरहू महिलेचा मृत्यू हा अन्नपाण्यावाचून झाला मात्र तेथेच हाकेवर आहे शिवभोजन केंद्र 
 सदरहू निराधार असलेली महिला ही अन्नपाण्यावाचून कारंजा बसस्टॅण्ड वर मृत्यू पावली. मात्र येथे हाकेेचे अंतरावर शिवभोजन केंद्र असून राज्य शासनाचे अनुदानातून हे सुरु आहे. मात्र तेथल्या तेथेच वृद्ध महिलेचा अन्नछत्र जवळच अन्नपाण्यावाचून मृत्यू होणे हे खरेच अत्यंत शोचनीय असेच होय. 

 
     
     
    
Post a Comment