Header Ads

FAKE मॅसेज पाठवू नका - महाराष्ट्र सायबर सेल चे आदेश


FAKE मॅसेज पाठवू नका - महाराष्ट्र सायबर सेल चे आदेश 
WHO, WhatsApp 
व मोफत रिचार्ज बाबतचे ते मॅसेज फेक 

कारंजा (जनता परिषद) दि.१७ - आजमितीला सर्वत्र सोशियल मिडीया ची पैठ असलेले दिसून येते आहे. मात्र यांत अनेक बाबींमध्ये  चुकीच्या बातम्या किंवा पोस्ट पाठविण्यात येत आहेत किंवा ते फॉरवर्ड केले जात आहेत. महाराष्ट्र शासनाचे सायबर विभागाचे यासर्व बाबींवर अतिशय बारकाईचे लक्ष्य असून फेक मॅसेज पाठविण्याचे संदर्भात अत्यंक कडक कारवाई पोलिस विभागाचे वतीने केली जाऊ शकते. 
महाराष्ट्र सायबर सेलचे वतीने काल अशाच तिन मॅसेज संदर्भात जे खुप व्हायरल होत आहेत, ते फेक असल्याची माहिती दिली आहे. 
१) जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO चे नावावर लॉकडाऊन चे कालावधी व त्याचे परिणाम याबाबत असलेली (चित्र क्र.१) चे मॅसेज हे फेक आहे. असा कोणताच मॅसेज WHO द्वारा टाकण्यात आलेला नाही. 
२) WhatsApp द्वारे मॅसेज टाकल्यावर टिकमार्क बाबत दिलेली तसेच कलर बदल होण्याची बातमी असलेले चित्र मॅसेज (चित्र क्र. २) हे ही चुकीचे म्हणजेच फेक आहे. 
३) विविध कंपन्यांचे रिजार्च लॉकडाऊन मुळे शासन
मोफत देत असल्याबाबतचा संदेश (चित्र क्र. ३) ही फेक आहे
नागरिकांनी त्यांना येणारे मॅसेज जसेच्या तसेे फॉरवर्ड न करता, त्याची शहानिशा करावी. मॅसेज मधील लिंक वर क्लिक करणे त्रासदायक ठरु शकते तरी ते टाळावे. कोणत्याही प्रकारचा सायबर गुन्हा दिसून आल्यास जवळचे पोलिस स्टेशनला कळवावे. तसेच नागरिकांनी फेक मॅसेज पाठवू नये तसेच अफवाही पसरवू नये असे आदेश महाराष्ट्र सायबर सेल चे वतीने देण्यात आलेले आहे. 

No comments

Powered by Blogger.