Header Ads

बँक कामकाजाचा कालावधी आता सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत


बँक कामकाजाचा कालावधी आता

सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत


वाशिम, दि. १७ (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार दवाखाने, औषधी दुकाने वगळता सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले होते. मात्र, या आदेशात अंशतः बदल करून जिल्ह्यातील सर्व बँकांच्या कामकाजाची वेळ  १८ एप्रिल २०२० पासून सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. ३ मे २०२० पर्यंत हे आदेश लागू राहतील.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात संचारबंदी काळात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी व खासगी बँका सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. मात्र, या आदेशात बदल करून बँक कामकाजाचा कालावधी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आला.

No comments

Powered by Blogger.