Header Ads

कारंजा तालुक्यात २३ चेकपोस्टवर अँटी कोरोना आर्मी कार्यरत

कारंजा तालुक्यात २३ चेकपोस्टवर अँटी कोरोना आर्मी कार्यरत 

१०८ शिक्षक, १८ कोतवाल सह पोलिस पाटील, सरंपच, तलाठी कर्तव्यावर

जनतेने सहकार्य करण्याचे तहसिलदार धिरज मांजरे यांचे आवाहन 

कारंजा (जनता परिषद) दि.२८ - कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांवरील ५ चेकपोस्ट सह आता नवीन २८ पोस्ट कार्यरत झाल्या आहेत. या पोस्ट वर निगराणी साठी  १०८ शिक्षक, १८ कोतवाल, १८ पोलिस पाटील, सरपंच, तलाठी हे सतत कार्यरत झाले आहेत. अशी माहिती तहसीलदार धिरज मांजरे यांनी दिली आहे. 
कारंजा शहर हे अमरावती विभागाचे मध्यवर्ती शहर असून आजमितीला रेड झोन मध्ये असलेलेे यवतमाळ, अकोला व अमरावती हे जिल्ह्यांच्या सिमा कारंजा तालुक्याला लागूनच आहेत. त्यामुळे चोरटे मार्ग म्हणून या कोणत्याही भागातून या मार्गाने येणार्‍या व्यक्तींमुळे तालुक्यात कोरोनाचा प्रसार होण्याचा खुप मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे येथे बंदोबस्त वाढविणे हे अगत्याचे झाले होते. त्याअनुषंगाने कारंजा महसुल व पोलिस प्रशासनाने ह्या बाबत रुपरेषा आखुन ह्या पोस्टद्वारा कारंजा तालुक्यातील जनतेचे जिवित्वाचे रक्षण करणेसाठी आपली तयारी चालविली आहे. 
अँटी कोरोना आर्मी ही कारंजा तालुक्याचे सिमेवर शहरात १) सावरकर चौक २) रामायण हॉटेल ३) अनई रोड ४) दारव्हा वेश तसेच ग्रामीण भागात १) सुकळी ते लोडी २) वाई ते जमकेश्‍वर ३) वाढोणा ते तारखेडा ४) धनज बु. ते साखरा ५) बेंबळा ते जामठी खु. ६) शिवण ते मुर्तिजापूर ७) खानापूर ते मोझर ८) खेडा बु. ते खांदला ९) काजळेश्‍वर ते मुर्तिजापूर १०) जानोरी ते पिंजर ११) धनज बु. ते पापड १२) अकोला जहॉ ते मुर्तिजापुर १३) धोत्रा जहॉ ते खिनखिनी १४) धनज खु. ते कवठा १५) मनभा ते अडगांव नेर १६) दुधोरा ते कारखेडा १७) म्हसला ते धामोरी १८) टाकळी बु. ते बोरगांव निंघोट या मार्गांवर पोलिस कृषिसहाय्यक, शिक्षक, माजी सैनिक व स्वयंसेवक ह्यांची अँटी कोरोना आर्मी ही २४ तास कार्यान्वीत झाली आहे. 
दरम्यान नागरिकांनीही घरातच राहावे, अनावश्यक रस्त्यावर येऊन आपले व परिवाराचे जीव धोक्यात घालू नये.  महानगर किंवा इतरत्र कोठूनही कोणी व्यक्ती कारंजा शहरात किंवा तालुक्यातील कोणत्याही गांवात आले असल्यास त्याची माहिती त्याने स्वत: किंवा परिजणांनी किंवा नागरिकांनी द्यावी जेणे करुन त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्या व्यक्तीचे, त्याचे परिवाराचे, मित्रगणांचे व इतरही नागरिकांचे जिवित्वाची काळजी घेता येईल असे आवाहन तहसिलदार धिरज मांजरे यांनी  केले आहे. 


No comments

Powered by Blogger.