Header Ads

घरोघरी गॅस सिलेंडर वितरण


सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करता येईल घरोघरी गॅस सिलेंडर वितरण

वाशिम, दि. २७ (जिमाका) : लॉकडाऊन काळात घरोघरी गॅस सिलेंडर वितरण करण्यास सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुभा देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. मात्र, गॅस एजन्सी सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी केंद्र शासनाने ३ मे २०२० पर्यंत वाढविला आहे. या काळात जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सी सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी दिले होते. त्यामध्ये बदल करून आता सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत घरोघरी गॅस सिलेंडर वितरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे सुधारित आदेश जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी निर्गमित केले आहेत.

No comments

Powered by Blogger.