Header Ads

कारंजा शहरात बिएलओ सह १३० शिक्षक बजावताहेत अँटी कोरोना आर्मीचे काम

कारंजा शहरात बिएलओ सह १३० शिक्षक बजावताहेत अँटी कोरोना आर्मीचे काम 

सर्व्हे सह प्रबोधन करण्याचेही करताहेत कार्य 

जनतेने सहकार्य करण्याचे तहसिलदार धिरज मांजरे यांचे आवाहन 

कारंजा (जनता परिषद) दि.२८ - शासनाचे निर्देशानुसार कारंजा शहरात आज रोजी निवडणूकीचे वेळेस कार्य करणारे बिएलओ (बुथ लेवल ऑफीसर) व शिक्षकवृंद ह्यांनी सर्व्हे व प्रबोधन असे दुहेरी कार्यासह अँटी कोरोना आर्मीचे काम सुरु केले आहे.  या कार्यात १३० शिक्षक वृंद सहकार्य करीत असून घरोघरी जाऊन परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींचा सर्व्हे करीत आहेत. निवडणूकीचे सर्व्हे व मतदानाचे कार्य यांचे असलेले अनूभव व विविध भागाची असलेली माहिती व संपर्क यामुळे बिएलओ सोबत हि शिक्षक मंडळी कुटुंब प्रमुखांना भेटून त्यांच्या घराबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्या व्यक्तींना ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे आहेत त्यांची माहिती देखील घेत आहेत. 
     तसेच नागरिकांनी कोरोनाच्या या महामारीच्या काळात कोणती काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, याबाबत प्रबोधन करण्याचेही कार्य करीत आहेत. पुढील काही दिवस हे काम सतत सुरु राहील अशी माहिती कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांचेवतीने देण्यात आली आहे. 
आपले शहर व तालुक्याच्या सिमा ह्या रेडझोन मध्ये असलेल्या यवतमाळ, अकोला व अमरावती ह्या जिल्ह्यांना लागून असल्याने तसेच इतरत्र ठिकाणाहून आलेल्या व्यक्तींमुळेही कोरोनाचा प्रसार शहरात व तालुक्यात होऊ शकतो अशी भिती आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेरुन आलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनास द्यावी, असे आवाहन तहसिलदार धिरज मांजरे यांनी केले आहे. 
मात्र विशेष करुन ह्या सर्व्हे करणार्‍या कर्मचार्‍यांची काळजी ही तेवढ्याच प्रमाणात घेतल्या जाणे गरजेचे आहे. याकडे शासनाने लक्ष्य देणे आवश्यक आहे. 



No comments

Powered by Blogger.