Header Ads

ग्राम पंचायतच्या १४ व्या वित्त आयोगातून ५% निधीतून अपंगांना किराणा किटचे वाटप

ग्राम पंचायतच्या १४  व्या वित्त आयोगातून ५% निधीतून अपंगांना किराणा किटचे वाटप 

ग्राम आखतवाडा व पिंप्री येथे अपंग बांधवांना किराणा किटचे वाटप 

कारंजा (ता.प्र.) दि.२९ - संपूर्ण जगात आज कोरोना ह्या महामारीने थैमान घातले आहे. शासन व प्रशासन जनततेचे पालक म्हणून आपली सर्व शक्तीपणाला जाऊन कार्य करीत आहे. अशावेळी समाजातील विविध घटकांचे मदतीसाठी विविध समााजीक संघटन, संस्था, व्यक्ती हे ही तितक्याच जोमाने कर्तव्य म्हणून आपापल्या परिने कार्य करीत आहेत. आखतवाडा ग्राम पंचायतच्या वतीनेही यावेळी १४ व्या वित्त आयोगातून ५% अपंग निधीतून ग्राम पंचायत क्षेत्रातील अपंग बांधवांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. 
ग्राम पंचायतच्या वतीने ग्राम आखतवाडा व पिंप्री येथे ३३ लाभार्थ्यांना जि.प.सदस्य सौ.सुनिताताई दिलीपराव नाखले व पं.स. सदस्य शुभम बोनके यांच्या हस्ते ह्या किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सौ.योगिता गावंडे, उपसरपंच देवेंद्र फुके, सदस्यगण पुष्पा धनद्रव्ये, मीना राऊत, उमेश भोजने, ऋषाली कान्हेरे, चंद्रकांत गावंडे, पोलिस पाटील किशोर जाधव, सचीव गजानन उपाध्ये सह दिपक कराळे व प्रमोद मानकर तसेच महाराष्ट्र राज्य रुद्र अपंग संघटनेचे अध्यक्ष विजय चवरे व उपाध्यक्ष अविनाश धनद्रव्ये उपस्थित होेते. 

No comments

Powered by Blogger.