Header Ads

उद्या महाराष्ट्र दिनी केवळ जिल्हा मुख्यालयीच होणार ध्वजारोहण


उद्या महाराष्ट्र दिनी केवळ जिल्हा मुख्यालयीच होणार ध्वजारोहण

 जिल्ह्यात इतर कोणत्याही ठिकाणी ध्वजारोहण करू नये

वाशिम, दि. ३० (जिमाका) : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे १ मे रोजी केवळ जिल्हा मुख्यालायीच ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. इतर संस्था अथवा कार्यालयांनी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करू नयेअसे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेला १ मे २०२० रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. मात्रसध्या कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असून या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षीचा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयीच ध्वजारोहण करण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यामुळे केवळ जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण होणार असून इतर कार्यालये व अन्य कोणत्याही ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करू नये. तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास इतर अधिकारीकर्मचारी व नागरिकांनी उपस्थित राहू नयेअसे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.