Header Ads

जेष्ठ पत्रकार मारहाण प्रकरण - गृहराज्यमंत्री ना.देसाई यांनी घेतली दखल

जेष्ठ पत्रकार मारहाण प्रकरण 

 गृहराज्यमंत्री ना.देसाई यांनी घेतली दखल 

त्या अधिकार्‍याची जिल्हा कंट्रोल रुमला बदली 


कारंजा (का.प्र.) दि.२२ - पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी सुधीर देशपांडे यांना व त्यांचे पुतण्याला पोलिसांनी दिलेल्या अमानुष वागणूकीची दखल गृहराज्यमंत्री व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री ना.शंभूराजे देसाई यांनी घेतली असून तात्काळ रुपाने संबंधीत पिएसआय ची बदली जिल्हा कंट्रोल रुमला करण्याचे आदेश देण्यात आलेत अशी माहिती मराठी पत्रकार परिषदचे विक्ष्वस्त किरण नाईक यांनी कारंजाचे पदाधिकार्‍यांना दिली आहे.  
देशपांडे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करीत पत्रकार बांधवांनी संबंधीत अधिकार्‍याला बडतर्फ करण्याची मागणी केली होती. तसेच मराठी पत्रकार परिषदचे जिल्हाध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी परिषदचे वरिष्ठ पदाधिकारी व नेते यांच्याशी या प्रकरणात कारवाईसाठी प्रयत्न चालविलेत. यावेळी गृहराज्यमंत्री ना.देसाई यांनी लॉकडाऊन उठल्यानंतर संबंथीत अधिकार्‍याचे विरोधात पुरावे दिल्यास आयजी मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

No comments

Powered by Blogger.