Header Ads

स्वस्त धान्य दुकानांविषयी तक्रारींचा निपटारा करण्यासाठी भरारी पथक स्थापन


स्वस्त धान्य दुकानांविषयी तक्रारींचा

 निपटारा करण्यासाठी भरारी पथक स्थापन

जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांची माहिती 



वाशिम, दि. २२ (जिमाका) : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले असून या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत धान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. या अन्नधान्याचे वितरण सुरळीतपणे होण्यासाठी, तसेच अन्नधान्य वितारणासंदर्भात स्वस्त धान्य दुकानांविषयी प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली आहे.
सध्या खुल्या बाजारापेक्षा स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य खरेदी करण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातील अन्नधान्य वितरण व्यवस्थितपणे होण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना राबवीत आहे. स्वस्त धान्य दुकानांबाबत अन्नधान्य वितरणातील गैरप्रकाराबाबतच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक गठीत करण्याच्या सूचना शासनामार्फत देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हास्तरावर पथक गठीत करण्यात आले आहे.
सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी एस. आर. शेळके (भ्रमणध्वनी क्र. ९६०४७०२३४३) यांच्या अध्यक्षतेखाली हे भरारी पथक कार्यरत राहणार आहे. यामध्ये जिल्हा पुरवठा कार्यालयातील निरीक्षण अधिकारी सुनील देशमुख (भ्रमणध्वनी क्र. ९९२१७५५०००), सहाय्यक लेखा अधिकारी संजय अंधारे (भ्रमणध्वनी क्र. ९९७५५६९०१९), कनिष्ठ लिपिक दीपक साठे यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. जाधव यांनी दिली आहे.

No comments

Powered by Blogger.