Header Ads

सॅनीटेशन टनेल/झोन : उपयोगी नव्हे तर घातक ?

Sanitation Tunnel : Harmful instead of any use 

सॅनीटेशन टनेल/झोन : उपयोगी नव्हे तर घातक ?

विषाणूसाठी नव्हे तर डोळे व त्वचेसाठी घातक


सॅनिटेशन टनेल बंद करण्यात येणार ?


जागतीक आरोग्य संघटना (WHO) आणि केंद्रीय आयुष मंत्रालयाचे निर्देश 


     कारंजा (जनता परिषद) दि.२२ - देशातील अनेक भागांप्रमाणेच कारंजा, कामरगांव तसेच वाशिम जिल्ह्यात .........
     कारंजा (जनता परिषद) दि.२२ - देशातील अनेक भागांप्रमाणेच कारंजा, कामरगांव तसेच वाशिम जिल्ह्यात इतरत्रही अनेक जागांवर नागरिकांचे आरोग्याचे दृष्टीने कोरोनाच्या विषाणूचा नायनाट करण्याचे दृष्टीने सॅनिटेशन टनेल लावण्यात आले आहे. मात्र अशा प्रकारचे सॅनिटेशन  टनेल हे आत्मघातकी पाऊल असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटना व केंद्रीय आयुष मंत्रालयाने दिले आहे. यामुळे अनेक जागांवर अशा प्रकारे लावण्यात आलेले टनेल किंवा सॅनिटेशन झोन हे हटविण्यात येत आहे. ह्या टनेल मधून होणार्‍या डिसइंफेक्टंट च्या मार्‍यामुळे विषाणू तर समाप्त होणार नाही मात्र डोळे व त्वचेचे रोग होण्याचा धोका संभवतो असे सांगण्यात आले आहे. तसेच यामुळे मळमळ होणे किंवा ओकारी होणे आदी प्रकारही होण्याचा धोका संभवतो. इतकेच नव्हे तर जागतिक स्तरावर स्वच्छता व संसर्ग रोखणेसाठी कार्य करणार्‍या Diversey ने कोरोनाग्रस्त असलेल्या किंवा नसलेल्या लोकांचे आरोग्यावर अत्यंत अपायकारक असल्याचे सांगितले आहे. डिसइंफेक्टंट मध्ये क्लोरीन, सोडीयम हायपोक्लोराईट किंवा काही तत्सम रसायनीकांचा चा वापर केला जातो जो डोळे व त्वचेसाठी हाणीकारक ठरु शकतो. ह्या डिसइंफेक्टंट चा वापर हा केवळ व केवळ (Surface) पृष्ठभागावर फवारणी साठीच केला जाऊ शकतो. हे कपड्यांवर किंवा कोणत्याही पोशाखावर कारगर आहेत, हे अद्याप पर्यंत तरी आढळून आलेले नाही. 

     शासकीय यंत्रणा, नगर परिषद, महानगरपालिका यांचे वतीने अनेक सार्वजनीक जागांवर, महत्वाचे शासकीय कार्यालयां समोर, पोलिस स्टेशन समोर, दवाखान्यां समोर हे टनेल किंवा झोन उभारण्यात आले आहेत. लोकांमध्ये याचे वापराची अती उत्सुकता दिसून येते असून यांतून गेल्यामुळे आता आपणांस जास्त काळजी घेण्याची गरज नाही, अशी भावना वाढीस लागून वारंवार हात धुणे, इतरत्र स्पर्श न करणे ह्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे प्रमाण वाढले आहे, जे अत्यंत घातक असे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सोशियल डिसटंसिंग हेच ह्या कोरोना रोगास थोपविण्याचे एकमेव व सवर्ंोच्च असे उपाय आहे. 

     याबाबत काही वृत्तपत्रांमध्‌ये आलेल्या वृत्तानुसार राज्य शासनाचे आरोग्य विभागाच्या संचालीका डॉ.अर्चना पाटील यांनीही रविवार रोजी दिशानिर्देश जारी केले असून ते तीन दिवस झाल्यावरही प्राप्त नाहीत किंवा त्यावर अंमलबजावणी झाली नाही असेच दिसून येते आहे. 


     कारंजा नगर परिषद, कामरगांव ग्राम पंचायत तसेच जिल्ह्यातील ज्या भागांमध्ये असे टनेल जेथे जेथे नगर परिषदांनी लावले आहेत, त्यावर आता कोणते निर्णय होते याकडे लक्ष्य राहणार आहे.

No comments

Powered by Blogger.