Header Ads

८३,२६७ उज्ज्वला लाभार्थ्यांना मिळणार तीन महिने मोफत सिलेंडर


वाशिम जिल्ह्यातील ८३,२६७ उज्ज्वला लाभार्थ्यांना मिळणार तीन महिने मोफत सिलेंडर


वाशिम (जनता परिषद) दि. ०१ : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गैरसोय होवू नये, याकरिता उज्ज्वला योजनेच्या लाभ्यार्थ्यांना एप्रिल ते जून या तीन महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील ८३ हजार २६७ लाभार्थ्यांना या निर्णयामुळे मोफत सिलेंडर मिळणार आहेत.

घरगुती सिलेंडरच्या पुनर्भरणाची रक्कम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आधीच जमा करण्यात येईल. एप्रिलमे आणि जून २०२०  तीन महिन्याकरिता प्रधानमंत्री उज्वला योजनेचा जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थी मोफत सिलेंडर मिळण्यासाठी पात्र असणार आहे. लाभार्थ्याला शेवटचे सिलिंडर मिळाल्यानंतर पंधरा दिवसांनी पुढील सिलेंडरसाठी तो नोंदणी करू शकतो. सिलेंडरची नोंदणी ही लाभार्थ्याच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरूनच करावी लागेल. ग्राहकांना सिलेंडर मिळण्यासाठी संबंधित एलपीजी गॅस वितरण कंपनीच्या शोरूम किंवा गोदामामध्ये जाण्याची आवश्यकता नाही, असे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे जिल्हा नोडल अधिकारी शिवा रेड्डी (भ्रमणध्वनी क्र. ७८९३१६६६३९) यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.