Header Ads

अन्यथा... दुचाकी जप्त होणार ठाणेदार सतीश पाटील यांचे निर्देश


अन्यथा... दुचाकी जप्त होणार 

 ठाणेदार सतीश पाटील यांचे निर्देश 

कारंजा (जनता परिषद) दि.१ - कोरोनाच्या या संकट समयी पोलिस प्रशासन व संपूर्ण यंत्रणा जीवावर उदार होऊन कर्तव्य करीत आहेत, मात्र अनेक नागरिक विनाकारणच रस्त्यावर येऊन अनावश्यक असा ताण निर्माण करीत आहेत. 

तरी आज दुपार पासून जो कोणी विनाकारण दुचाकी घेऊन रोडवर दिसून येईल त्याची दुचाकी जप्त करण्यात येईल  तसेच कडक कारवाई ही करण्यात येईल असा ईशारा कारंजाचे शहर ठाणेदार सतीश पाटील यांनी दिला आहे. प्रशासन हे जीवपणाला लावून केवळ व केवळ नागरिकांच्या जिवित्वाचे रक्षणासाठी रस्त्यावर उतरले असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.