Header Ads

जगावर कोरोनाचा कहर आत्तापावेता ४३,२७५ मृत्यूमूखी


जगावर कोरोनाचा कहर 

आत्तापावेता ४३,२७५ मृत्यूमूखी

कोरोना ह्या अदृश्य शैतानाने संपूर्ण मानव जातीला नामोहरम केले असून द्वितीय विश्‍वयूद्धा नंतर संपूर्ण जगाला त्रासून सोडणार्‍या आपदाचे नाव हे कोरोना बनले आहे. चीन पासून सूरू झालेल्या ह्या विपदेमुळे यूरोपीन देशांची संपूर्णपणे वाताहत झालेली असून जगाची महासत्ता असलेले अमेरिकेतही याने विक्राळ रुप घेतलेले आहे. 
भारतात आजरोजी लॉकडाऊन मुळे परिस्थिती मोठ्या प्रमाणावर आटोक्यात आलेली असून काही अपवाद सोडून बहुसंख्य लोक शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत असल्यामुळे आजतरी भारताची परिस्थिती ही आटोक्यात आहे. मात्र तरीही मृतकांचा आकडा हा 5० वर पोहोचलेला आहे. 
worldometer.info नुसार जगात आत्तापावेतो ४३,२७५ नागरिक हे मृत्यूमुखी पडले असून कोरोना बाधीतांची   संख्या ही ८,७२,९७२ झाली असून आजच्या तारखेत ९७३ नागरिक हे मृत्यूमुखी पडले आहेत यांत केवळ स्पेन मधील ५८९ नागरिकांचा समावेश आहे. 
विविध देश व तेथे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या ही पुढील प्रमाणे आहे. 

देश             बाधीत        मृत्यू 
जग           ८,७२,९७२     ४३,२७५
अमेरिका    १,८८,६३९         ४,०५९
इटली         १,०५,७९२        १२,४२८
स्पेन          १,०२,१३६          ९,०५३
चीन           ८१,५५४           ३,३१२
जर्मनी       ७२,३८३            ७८८
फ्रान्स  ५२,१२८            ३,५२३
इरान         ४७,५९३           ३,०३६
इंग्लंड       २५,१५०            १,७८९
नेदरलॅड    १२,५९५            १,०३९
बेल्जीयम  १३,९६४             ८२८
ब्राझील      ५,८१२              २०२
स्विडन      ४,४३५             १८०
भारत        १,५९०                ४५

No comments

Powered by Blogger.