Header Ads

जागतिक महामारीच्या सावटाखाली कारंजा नगरीत पत्रकार-पोलिस वाद विकोपाला


जागतिक महामारीच्या सावटाखाली कारंजा नगरीत  पत्रकार-पोलिस वाद विकोपाला 

जिल्हा व सत्र न्यायालयाने पत्रकार देशपांडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन केला मंजूर

अॅड.जुनेद खान यांनी केले मुद्देसुद युक्तिवाद

      कारंजा (का.प्र.) दि. २४ -  दिनांक 21.4.20 रोजी  पो.स्टे. कारंजा ग्रामीण येथे कारंजा शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व व दैनिक पूण्यनगरी चे पत्रकार सुधीर देशपांडे व त्यांचा पुतण्या राघव देशपांडे विरुद्ध  भा. दं. वि.१८६०, चे कलम ३५३,३३२,२९४,५०४,५०६,१८८ तसेच मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम १३० ,१७७ तसेच महाराष्ट्र _कोविड-१९_ विनियमन २०२० चे कलम ११, तसेच साथीचे रोग अधिनियम,१८९७ चे कलम २, ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर  गुन्हा हा कारंजा  ग्रामीण पो.स्टे. येथे कार्यरत असलेल्या  पोलीस उपनिरीक्षकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे दाखल करण्यात आला होता. सदर फिर्यादनूसार फिर्यादी हे आपल्या  दोन सहकारी पोलिस कर्मचार्या सोबत कारंजा- सोमठाणा मार्गावर गस्त ड्युटीवर कार्यान्वित होते व मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोविड 19 संदर्भात दिलेल्या दिशा निर्देशाचे उल्लंघन करणार्या व्यक्तींवर कार्यवाही करण्यासाठी कामठवाडा फाटयाजवळ उपस्थित होते. त्यादरम्यान  पत्रकार सुधीर देशपांडे व त्यांचे पुतण्या राघव देशपांडे हे 11.30 वा दरम्यान दुचाकीने कारंजा शहराच्या दिशेने चेहर्यावर मास्क न लावता  आले व त्यांना त्यांची दुचाकी थांबवण्यासाठी पोलीसकडून सांगण्यात आले असता व कायदेशीर रित्या मास्क न लावल्यामुळे दंड भरण्यास सांगितले असता सुधीर देशपांडे व राघव देशपांडे यांनी फिर्यादी व ईतर पोलिसांना अश्लील शिवीगाळ करून, पोलिसाची काठी हिसकावून लोटलाट करून त्यांचे शासकीय कर्तव्य बजावताना अडथळा निर्माण केला.
       अश्या फिर्यादीवरून सुधीर देशपांडे व राघव देशपांडे यांचेवर वरील प्रमाणे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
     याऊलट सुधीर देशपांडे यांनी कारंजा शहर पो. स्टे. ला दिलेल्या फिर्यादनुसार ते व त्यांचा पुतण्या ये त्यांचे गंगापूर येथे शेतात तोंडावर मास्क लाऊन शेतीपयोगी साहित्य घेऊन जात असताना पॉवर हाउस जवळ पोलिसांनी अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ करून पैसे मागून जबरदस्त मारहाण करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली व पोलिस स्टेशन ल घेऊन आले. त्यानंतर देशपांडे यांनी सदर बाब वरिष्ठांचे निदर्शनास आणून दिली व झालेल्या प्रकारची रीतसर तक्रार कारंजा शहर पो.स्टे. ला संबंधित पोलिसांविरुद्ध दिली. त्यावर अद्याप काही कारवाई झाली नाही.
     या प्रकरणात सुधीर देशपांडे व राघव देशपांडे यांनी अॅड.जुनेद खान यांचे मार्फत अटकपूर्व जामीन अर्ज वि.जिल्हा व सत्र न्यायाधीश,मंगरूळपिर यांचे समक्ष दाखल केला. सदर प्रकरणात आज रोजी वाशिम येथे  अॅड.जुनेद खान यांनी मुद्देसूद युक्तीवाद केला व  झालेल्या सुनावणीत विद्यमान न्यायालयाने तो प्रथम दर्शनी ग्राह्य धरून सुधीर देशपांडे व राघव देशपांडे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

No comments

Powered by Blogger.