Header Ads

दिलासा : जिल्हा झाला कोरोना मुक्त

दिलासा : जिल्हा झाला कोरोना मुक्त 

जिल्ह्यातील एकमेव कोरोना संक्रमीत झाला कोरोनामुक्त



वाशिम (जनता परिषद) दि.२४ - आज वाशिम जिल्हा कोरोना मुक्त झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांमध्ये एक दिलास्याचे वातावरण दिसून आले आहे. जिल्ह्यातील एकमेव कोरोनाग्रस्त रुग्णाची दुसर्‍यांदा घेण्यात आलेले दोन्ही फॉलोअप हे निगेटीव्ह आल्यामुळे तो रुग्णही कोरोनामुक्त झाला आहे. लवकरच त्या रुग्णाला घरी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक  यांनी दिलेली आहे. 
आजची रुग्णांची स्थिती पुढील प्रमाणे आहे. 
एकुण संख्या - ७५, गृह विलगीकरणात ३१, संस्थात्मक विलगीकरणात २५, स्व्ॅब नमुने घेतल्यांची संख्या ४१, निगेटीव्ह ३६, पॉसिटिव्ह १ आणि याच रुग्णाचे प्रथम तपासणीतील पहिले निगेटिव्ह तर दुसरे पॉझिटिव्ह आले होते. तर दुसर्‍यांदा घेण्यात आलेल्या तपासणीचे आज आलेले दोन्ही निकाल हे निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 
जिल्ह्याचे महसुल, पोलिस व आरोग्य अधिकार्‍यांमुळे आज जिल्हा सुरक्षीत 
वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे योग्य मार्गदर्शन व वेळोवेळी घेण्यात आलेल्या योग्य अशा निर्णयांमुळे व त्यांच्या अंमलबजावणीमुळेच वाशिम जिल्हा हा कोरोना मुक्त राहण्यास मदत मिळाली आहे. 
महसुल, पोलिस, आरोग्य या तिन्ही विभागांचा जिल्ह्यात कोरोना ह्या वैश्‍विक रोगाचा फैलाव रोखणे साठीचा प्रयत्न नक्कीच अभिनंदनीय असाच आहे. 

No comments

Powered by Blogger.