Header Ads

तरुण व्यापारी ब्रिजमोहन मालपाणी व शितल देवडा यांनी कर्तव्यनिधी


तरुण व्यापारी ब्रिजमोहन मालपाणी व शितल देवडा यांनी कर्तव्यनिधी म्हणून 
प्रत्येकी १ लाख ११ हजार रुपयांची 
सहयोग राशी दिली तहसिलदार यांचेकडे 

कारंजा (जनता परिषद) दि.२३ - संकटाच्या काळात देश, राज्य, व समाजाचे सोबत उभे राहून मदत म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून सोबत असणे हेच खरे देशप्रेम होय. असेच काहीसे उदाहरण कारंजाचे यशोदा दाल मिल चे संचालक ब्रिजमोहन मालपाणी तसेच त्यांचे मित्र शितल देवडा यांनी आपले कार्यातून दाखविले आहे. 
तरुण व्यापारी, समाजसेवी  व कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीेचे संचालक ब्रिजमोहन मालपाणी यांनी आपले कर्तव्य म्हणून देशभावनेतून १ लक्ष ११ हजार रुपयांचा धनादेश कोरोनाच्या या युद्धात आपला कर्तव्यनिधी म्हणून दिला. विशेष म्हणजे काल दि. २२ एप्रील रोजी ब्रिजमोहन मालपाणी यांच्या अर्धांगिनी सौ.वंदनाजी यांचा वाढदिवस होता.
ब्रिजमोहन मालपाणी, सौ.ंवंदनाजी मालपाणी यांनी उभयहस्ते कारंजाचे तहसीलदार धिरज मांजरे यांच्याकडे हा धनादेश सुपुर्द केला. 


शितल देवडा यांनीही  दिली १ लाख ११ हजार रुपयांची सहयोग राशि 

येथील प्रतिष्ठीत व सुस्वभावी असलेले शितलजी देवडा यांनीही कर्तव्यभावना म्हणून १ लाख ११ हजार रुपयांचे योगदान एक कर्तव्य म्हणून यावेळी तहसीलदार धिरज मांजरे यांचे कडे सुपुर्द केले. शितल यांचे २१ एप्रील रोजी वाढदिवस होता. 

No comments

Powered by Blogger.