Header Ads

भगवान श्री परशुराम जयंती घरीच पुजा अर्चना करुन साजरी करा

भगवान श्री परशुराम जयंती 

घरीच पुजा अर्चना करुन साजरी करा


ब्राम्हण महासभा व राजस्थानी ब्राम्हण मंडळाचे आवाहन

कारंजा (जनता परिषद) दि.२४ - कोरोनाच्या या वैश्‍विक महामारीचे संकटकाळात देशबांधवांचे सुरक्षीततेसाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे. अशात भगवान श्री परशुराम यांची जयंती दिनी म्हणजेच २५ एप्रील रोजी सर्वच ब्राम्हण बांधवांनी आपले घरीच भगवान परशुरामांची पुजा अर्चना करुन संपुर्ण जगाचे व आपले देशावर आलेले हे संकट दुर व्हावे अशी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसुधैव कुटुंबकम व सर्वे सुखीन: सन्तू ही आपली भावना असून या संकटकाळातून प्रत्येक भारतीयाचे रक्षण व्हावे अशी प्रार्धना सर्वांनीच करावी, असे आवाहन केले आहे.
ब्राम्हण बांधवांचे आराध्य असलेेले भगवान श्री परशुराम यांची जयंती कारंजात मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी केली जाते. कारंजातील समस्त ब्राम्हण बांधवांचे वतीने सकाळी मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले जात असते. तर राजस्थानी ब्राम्हण मंडळाचे वतीेने स्थानीक महावीर भवन येथे विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते. मात्र आजरोजी हे शक्यच नसल्याने तसेच कोठेच नागरिक एकत्र येऊ नये यासाठी प्रत्येक भावीकाने आपले घरातच पुजा अर्चना करावी असे आवाहन केले गेले आहे. 

श्री गजानन महाराज यांची पोथी श्री गजानन विजय चे पारायण

१७ एप्रील रोजी कारंजा ब्राम्हण महासभेचे वतीने आपापले घरी राहून १०८ भावीकांनी श्री गजानन महाराज यांची पोथी श्री गजानन विजय चे पारायण करण्याची नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला भावीकांनी मोठा प्रतिसाद दिला. सुमारे १३६ जणांनी यावेळी तीन दिवसाचे पारायण केले. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.