Header Ads

कोरोनाच्या त्रासदीत भारत गॅसची अविरत सेवा


कोरोनाच्या त्रासदीत भारत गॅसची अविरत सेवा 

साठा मुलबल, नागरिकांनी चिंता करु नये - शेखर बंग 


कारंजा (जनता परिषद) दि.१ - आजमितीला संपूर्ण जगत हे कोरोना ह्य न दिसणार्‍या जीवघेण्या राक्षसापायी त्रस्त झाले आहे. अशा वेळी संपूर्ण आरोग्य विभाग, पोलिस विभाग व स्वच्छता विभाग हे आपले जीव मूठीत घेऊन देवदुता सारखे जनतेच्या रक्षणार्थ सज्ज झाले आहेत. 
अशातच जेव्हा नागरिक हे शासनाचे आदेशाचे पालन  करुन घरातच आहेत त्यावेळेस सर्वात जास्त गरजेची वस्तू झालेली आहे ती म्हणजे सिलेंडर. कारंजा शहराला नियमीतपणे गॅस सिलेंडरचा पूरवठा करणारे भारत गॅस चे संचालक, स्टाफ व पूरवठा करणारे हे ही नागरिकांना नियमीत सिलेंडर घरपोच देऊन नागरिकांना पूरविण्यात येणार्‍या सेवेत भर घालीत आहेत. 


७ गाड्यातून १४ डिलीवरी बॉईज करीत आहेत वितरण 

भारत गॅसचे संचालक मा.श्री.शेखर बंग यांनी दिलेल्या माहितीनुसार दररोज ६०० ते ६५० सिलेंडरचे वितरण सुरु असून एकुण ७ गाड्यांचे मदतीने शहरातील काण्याकोपर्‍यात १४ डिलीवरी बॉईज च्या सहकार्याने सिलेंडर वितरण सुरु आहे. विशेष म्हणजे आज दि. १ एप्रील पासून सिलेंडरचे दरात ६२ रुपयांची घट झालेली आहे. साठा मुलबक प्रमाणात असून पुरवठा ही सुरळीत होत आहे, त्यामुळे नागरिकांनी सिलेंडरचे बाबतीत चिंता करु नये असेही त्यांनी सांगितले आहे. 


उज्जवला योजनाचे सलग ३ महिन्याचे अनुदान येणार खात्यात 

गोरगरीबां पर्यंत सिलेंडर पोहोचावा ह्या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या उज्वला योजनांतर्गत देण्यात येणार्‍या सिलेंडर साठी ५ एप्रील नंतर खात्यावर दर महिन्याला १ सिलेंडर यानुसार ३ महिन्यांचे अनुदान थेट जमा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.