Header Ads

जि.प. सर्कल साठी रु.26 लाखाचा निधी वितरीत


ग्रामिण भागात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद सरसावली

जि.प. सर्कल साठी रु.26 लाखाचा निधी वितरीत

कोविड-19 चे पेशंट ने-आण करणेस वाहन सुविधा व तातडीची तपासणी करण्यासाठी वापर 

     वाशिम दि24 - ग्रामिण भागात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना आणि आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या शेष फंडातुन रु. 26 लाखाची तरतुद करण्यात आली आहे. प्रति सर्कल 50 हजार याप्रमाणे 52 सर्कल करीता एकुण रु. 26 लाख रुपयाचा निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.
    संपूर्ण जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरस बाबत आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागात जनजागृती करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी मागील आठवडयात आरोग्य विभागाला दिले होतेत्यानंतर आज उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना आणि आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी पुढाकार घेऊन पुढील काळात गावातील लोकांना अडचणीचा सामना करावा लागुनये यासाठी आर्थिक तरतुद करुन ठेवली आहे.
     सदरचा निधी हा कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येणार असुन तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्या स्तरावर उपलब्ध आहे. या निधीचा उपयोग कोविड-19 चे पेशंट ने-आण करण्यासाठी वाहन सुविधा उपलब्ध करणे व तातडीची तपासणी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे . तसेच संबंधित गटाचे जिल्हा परिषद सदस्य आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुचविलेल्या कामाकरीता हा निधी वापरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.

No comments

Powered by Blogger.