Header Ads

स्वच्छाग्रहींनी कोराना विषयी जनजागृती करावी


स्वच्छाग्रहींनी कोराना विषयी जनजागृती करावी 

जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचे आवाहन 

     वाशिम (जनता परिषद ) दिनांक १८ - महाराष्ट्रात कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने मोठया प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमिवर ग्रामिण भागात जनजागृती करीता ग्रामपंचायतीच्या स्वच्छाग्रहींनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले. दिनांक 17 रोजी गट विकास अधिकारी यांच्या बैठकीत चंद्रकांत ठाकरे यांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा केली.
      केंद्र शासना कडुन कोरोना रोगावर नियंत्रण मिळवण्याच्या कामात गाव स्तरावरील आशा आणि अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे. आणि आता या कामात स्वच्छाग्रहींची मदत घेण्याबाबत केंद्र शासनाने राज्य शासनाला कळविले आहे. गावातील स्वच्छाग्रहींची माहिती अदयावत करण्यात येत असुन याबाबत ग्रामसेवक व सरपंचांनी पाठपुरावा करण्याचे आवाहन जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले आहे. ग्रामसेवकां मार्फत स्वच्छाग्रहींच्या कामाचा अहवाल गट विकास अधिकारी यांनी घेऊन शासन निर्देशानुसार स्वच्छाग्रहींचे पुर्वीचे व आत्ताचे मानधन अदा करण्याचे निर्देशही ठाकरे यांनी बैठकीत दिले.
     गावातील लोकांमध्ये कोरोना या आजारांबाबत शासना मार्फत आलेली माहिती पोचविण्याचे तसेच स्वच्छतेबाबत संदेश देण्याचे काम स्वच्छाग्रहींनी करावे आणि आपल्या गावात या रोगाचा प्रसार होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन जि प अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले. 
       बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीनाजिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉश्याम गाभणे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी तापी, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, एमआरईजीएस चे प्रभारी गट विकास अधिकारी तथा स्वच्छ भारत मिशनचे सहायक प्रशासन अधिकारी एच. जे. परिहार यांची उपस्थिती होती.

No comments

Powered by Blogger.