Header Ads

श्री संत गजानन महाराज संस्थान, धानोरा

श्री संत गजानन महाराज संस्थान, धानोरा धावून आले मदतीसाठी 

संस्थानचे वतीेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २० हजार रुपयांचा हातभार

कारंजा (जनता परिषद) दि.१७ - तालुक्यातील ग्राम धानोरा येथील श्री संत गजानन महाराज संस्थान कोरोना रुपी या संकटाचे समयी आपले कर्तव्य म्हणून धावून आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला २० हजार रुपयांचे निधीचा धनादेश यावेळी संस्थानचे वतीने कारंजाचे तहसीलदार धिरज मांजरे यांना सुपूर्द करण्यात आला. संस्थानचे अध्यक्ष विष्णूपंत लबडे सह यावेळी संस्थानचे इतरही विश्‍वस्त मंडळी उपस्थित होती. संस्थानचे या दातृत्वाचे यावेळी तहसीलदार धिरज मांजरे यांनी कौतूक केले. राष्ट्र संकटात असतांना मानवतेच्या दृष्टीकोनातून संस्थाने केलेली ही मदत लाख मोलाची असल्याचे त्यांनी सांगितले. 

दानशूर व्यक्ती, खाजगी संस्था, सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्था यांनी 
मदतीसाठी समोर यावे तहसीलदार धिरज मांजरे यांचे आवाहन

राज्यामध्ये सुरु असलेल्या महाभयंकर कोरोना संसर्गजन्य साथी रोगावर नियंत्रण करण्याकरीता राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावात लॉकडाऊन कालावधीत बेघर, विस्थापीत कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार यांच्या साठी निवारागृह, अन्नधान्य व भोजन व्यवस्थेसाठी हा निधी वापरला जाणार आहे. तसेच ज्या स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, सहकारी संस्था, दानशूर व्यक्ती यांना अन्नधान्य व निधी स्वरुपात मदत करावयाची असेल त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार धिरज मांजरे यांनी केले आहे. 

No comments

Powered by Blogger.