Header Ads

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची कामे करताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आदेश


महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची कामे करताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आदेश


जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांचे आदेश 


वाशिम, दि.०७ (जिमाका) : जिल्ह्यात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची कामे करताना आवश्यक खबरदारी घेण्यात यावी. तसेच सामाजिक अंतर ठेवून कामे करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची कामे करताना सद्यस्थितीत कार्यक्षेत्रावर, कॅम्पमध्ये कार्यरत मजुरांमार्फतच कामे करण्यात यावीत. कॅम्पबाहेरून कोणतेही नवीन मंजूर आणण्यास तसेच कॅम्पवरील मजुरांना अथवा कुटुंबियांना कॅम्प साईट सोडून जाण्यास पूर्णतः प्रतिबंध करावा. मजुरांना क्षेत्रीय बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या कॅम्पमध्येच दैनंदिन जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी आवश्यक अन्नधान्य, किराणा माल व इतर आवश्यक बाबी उपलब्ध करण्याची व्यवस्था कंत्राटदारांनी करावी. सामाजिक अंतर ठेवून प्रत्यक्ष कामे होत असल्याची खात्री कंत्राटदार व कंत्राटदाराच्या पर्यवेक्षी अभियंत्यांनी करावी व त्यासाठी आवश्यक कार्यपद्धती क्षेत्रीय ठिकाणी अवलंबिण्यात यावी.

कार्यक्षेत्रावरील कॅम्पमधील मजूर, त्यांचे कुटुंबीय, पर्यवेक्षी कर्मचारी, अभियंते यांच्यापैकी कुणालाही कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्यास त्याबाबत तातडीने महसूल, आरोग्य विभागास कळविणे व स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहील. कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत सर्व मजुरांना व साईटवरील कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयक माहिती व मार्गदर्शक सूचना त्यांच्या मातृभाषेत स्पष्टपणे अवगत करण्यात याव्यात, तसेच या सूचनांचे पालन होते आहे, याची खातरजमा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सर्व संबंधितांना दिले आहेत.

No comments

Powered by Blogger.