Header Ads

श्री गुरुमंदीर संस्थान देशावर आलेल्या आपत्तीत मदतीसाठी सरसावले


श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान कारंजा दत्तचे वतीने पि.एम. केअर फंडला २१ लक्ष रुपये 

श्री गुरुमंदीर संस्थान देशावर आलेल्या आपत्तीत मदतीसाठी सरसावले

कारंजा (जनता परिषद) दि.७ - देशावर कोसळलेल्या आपत्तीच्या वेळी कारंजाचे गुरुमंदीर संस्थान म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान ने २१ लक्ष रुपयांची मदत पि.एम.फंड मध्ये केली आहे. 
कारंजा तहसील प्रशासनाचे प्रमुख तहसीलदार धीरज मांजरे यांना २१ लक्ष रुपयांचा धनादेश यावेळी संस्थानचे अध्यक्ष श्री खेडकर गुरुजी यांचे हस्ते देण्यात आला. 
आजमितीला संपूर्ण जगावर कोरोना ह्या रोगामुळे थैमान माजले असून आपल्या देशातही यामुळे मोठे संकट उभे ठाकले आहे. तरी या संकटसमयी प्रत्येक भारतीयाने शासन व प्रशासन सह उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. कारंजाचे श्री गुरु मंदीर संस्थान हे संकटसमयी नेहमी धावून गेले आहे. आजही संस्थानने २१ लक्ष रुपयांची मदत निधी पि.एम. केअर फंडला दिली. 
यावेळी संस्थानचे व्यवस्थापक मामासाहेब सस्तकर, विश्‍वस्त प्रकाश घुडे, पारस्कर काका, अविभाऊ खेडकर, निलेश घुडे, रमेश देशमुख, अनंत डबीर, नंदकिशोर बघेल, पंकज कर्वे हे उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.