Header Ads

अकोला जिल्ह्यातही आढळला पहिला कोरोना रुग्ण

अकोला जिल्ह्यातही आढळला पहिला कोरोना रुग्ण 

आज सायंकाळी ५.०० वाजता मिळाला अहवाल

अकोला (प्रती.) दि.७ - अकोला जिल्ह्यात अद्याप पावेतो एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाला नव्हता. मात्र आज सायंकाळी ५.००  वाजता प्राप्त अहवाल नुसार एक रुग्ण कोरोना बाधीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 
आजपर्यंत एकुण १२३ नमुने हे तपासणी साठी पाठविण्यात आलेले असून यांतील ८६ चे अहवाल प्राप्त झाले आहे. यांतील ८५ हे निगेटिव्ह आले असून आज प्राप्त अहवालातील एक हा कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले आहे. तर ३७ जणांचे अहवाल हे अद्याप पर्यंत येण्याचे बाकी आहे. 

No comments

Powered by Blogger.