Header Ads

गॅस एजन्सीचे कामकाज सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु राहणार


गॅस एजन्सीचे कामकाज सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु राहणार

वाशिम, दि.१५ (जिमाका) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी केंद्र शासनाने ३ मे २०२० पर्यंत वाढविला आहे. या काळात जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सी सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.
तसेच धनज बु. (ता. कारंजा लाड) येथील विश्वजित वैष्णवी पेट्रोलपंप २४ तास सुरु राहील, असे आदेश यापूर्वी देण्यात आले होते. या आदेशाला सुद्धा ३ मे २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

No comments

Powered by Blogger.