Header Ads

कृषि मालाच्या वाहतुकीसाठी डीझेल उपलब्ध करून देण्यास मुभा

कृषि मालाच्या वाहतुकीसाठी डीझेल उपलब्ध करून देण्यास मुभा

       वाशिम, दि. १५ (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याने कृषि मालाच्या वाहतुकीसाठी डिझेल विक्रीची वेळ अपुरी पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपांवर कृषि मालाच्या वाहतुकीसाठी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत केवळ डिझेल विक्रीला मुभा देण्यात आली आहे. पेट्रोल विक्रीची वेळ मात्र सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंतच राहणार आहे.
        केंद्र शासनाने ३ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा असलेल्या कृषि सलंग्न बाबी, कृषि उत्पादनांची वाहतूक तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कृषि मालाची वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपावर सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कृषि मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना केवळ डिझेल विक्रीस मुभा देण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय सेवा व शासकीय वाहनांना २४ तास इंधन पुरवठा करण्याची मुभा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.

No comments

Powered by Blogger.