Header Ads

कोरोनाग्रस्त रुग्णाची पहिली पाठपूरावा चाचणी निगेटिव्ह

जिल्ह्यासाठी दिलासा दायक पण...थोडी वाट बघा 

कोरोनाग्रस्त रुग्णाची पहिली पाठपूरावा चाचणी निगेटिव्ह 

वाशिम (जनता परिषद) दि.१७ - एक कोरोनाग्रस्त रुग्ण असलेल्या वाशिम जिल्ह्यासाठी आज एक दिलासा दायक गोष्ट समोर आली आहे. त्या रुग्णाची पहिली पाठपूरावा चाचणी (First Follow-Up Report) निगेटिव्ह आली आहे. बातमी दिलासादायक आहे, मात्र दुसरी पाठपुरावा चाचणी ही निगेटिव्ह आल्यास रुग्णाला निगेटिव्ह म्हणून घोषीत करण्यात येऊ शकते. तरी दुसरी चाचणीही निगेटिव्ह निघावी अशी प्रार्थना जिल्ह्यातील नागरिक करीत आहेत. 
जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कोरोना संदर्भातील आजचा अहवाल 
जिल्ह्यात एकुण निगराणीत ठेवलेल्या रुग्णांची संख्या ६५ असून यांतील २४ गृह विलगीकरणात (Home Quarantine) व ४० जणांना संस्थात्मक विलगीकरणात (Institutional Quarantine) ठेवण्यात आलेले आहे. तर १ व्यक्तीला वार्डमध्ये अलगीकरणात (Isolation) ठेवण्यात आलेले आहे. आतापावेतो २९ जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून २७ निगेटिव्ह असून १ रिपोर्ट येणे बाकी आहे. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.