Header Ads

कोरोनाचे संदर्भात सर्व प्रकारची काळजी जनतेने घ्यावी


कोरोनाचे संदर्भात सर्व प्रकारची काळजी जनतेने घ्यावी


शासकीय, प्रशासकीय यंत्रणा जीव ओतून करीत आहे कर्तव्य 



जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांचे कळकळीचे आवाहन  


               कारंजा (प्रति.) दि.४ - कोरोनाच्या ह्या मानवतेच्या अदृश्य शत्रुचे विरोधात आज संपूर्ण जग लढा देत आहे. केंद्र शासन तसेच राज्य शासन ह्या संदर्भात शक्य ते सर्व कर्तव्य करण्याचे प्रयत्न करीत असून प्रशासकीय यंत्रणाही जीव ओतून आपले कर्तव्य करीत आहे. तरी कोरोनाचे विरोधातील ही लढाई जिंकण्यासाठी समस्त नागरिकांनी सर्व प्रकारची काळजी घ्यावी असे आवाहन विाशिम जिल्ह्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केली आहे. 

             वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासना कडून अहोरात्र मेहनत घेऊन झटत आहेत. वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मा श्री ऋषिकेश मोडक सर यांचे मार्गदर्शनात जिल्हा पोलिस अधीक्षक मा श्री वसंत परदेशी सर,निवासी उपजिल्हाधिकारी मा श्री शैलेश हिंगे सर यांचेसह जिल्हा शल्य चिकित्सक मा श्री सोनटक्के सर,जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेसह जिल्ह्यातील सर्व डॉक्टर, नर्स, पोलीस, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, तलाठी, सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पत्रकार बंधू, सामाजिक कार्यकर्ते, मेडिकल व इतर मंडळी खूप मेहनत घेत आहे.
            माझी जिल्ह्यातील सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे.जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणीही घराबाहेर पडू नये. एका ठिकाणी गर्दी करु नये. शासनाचे नियमांचे उल्लंघन करु नये. या करिता आपल्या सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन आपल्याला सर्वंतोपरी मदत करीत आहेत. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडणार नाही. भाजीपाला, किराणा दुकान, मेडिकल येथे सकाळी 8 ते 12 वेळेत वस्तू खरेदी करतांना आपण सर्वांनी सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. तसेच तोंडाला मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटाइझर चा वापर करावा. जीवन अमुल्य आहे.स्वतःची काळजी स्वतःच घ्या. कोरोना संदर्भात कोणत्याही प्रकारचे लक्षण आढळल्यास जवळच्या दवाखान्यात ताबडतोब जावे व डॉक्टर यांचेकडून तपासणी करून घ्यावी. इतर महानगरातून आलेल्या व्यक्तीने कोरोना टेस्ट करून घ्यावी.तसेच जिल्हा बंदी असल्याने कोणीही आपल्या जिल्ह्यातुन बाहेर जाऊ नये. त्याच प्रमाणे सर्दी, ताप, शिंका,खोकला, घसा खवखव करणे ही साधारता लक्षणे दिसल्यास डॉक्टर यांचे कडून तपासणी करावी. तसेच तोंडाला मास्क वापरावा. हॅन्डग्लोज चा वापर करावा. दिवसातुन सात ते आठवेळा हॅन्डवॉश किंवा साबणाने हात धुवावे. तसेच सॅनिटाईझरचा वापर करणे आवश्यक आहे. सोसिअल डिस्टनसिंग ठेवणे खुप गरजेचे आहे.यामुळे स्वतःपासून इतरांना त्रास होणार नाही. याची काळजी प्रत्यकानी घ्यायला हवी. कोरोनावर मात करायची असेल तर कोणीही बाहेर पडू नये. जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. डॉक्टर, नर्स, पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने काम करीत आहे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. 

             आमचे भाग्य आहे की ,आम्हाला कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मा श्री ऋषीकेश मोडक सर,जिल्हा पोलिस अधीक्षक मा श्री वसंत परदेशी सर, निवासी उपजिल्हाधिकारी मा श्री शैलेश हिंगे सर यांचेसह उपविभागीय अधिकारी, जिल्ह्यातील सर्वं तहसीलदार, सर्व पोलीस अधिकारी, सर्व मुख्याधिकारी, नगर परिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सामाजिक कार्यकर्ते, पंचायत समिती पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकारी सर्व गावकरी मेहनत घेत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी खूप मेहनत घेत आहेत. माझी जिल्ह्यातील सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे की, कोनीही लॉकडाऊनच्या काळात घरा बाहेर पडू नका. कोरोनाला हरू या, एकजुटीने लढा देऊ या.

No comments

Powered by Blogger.