Header Ads

स्वच्छता कर्मचार्‍यांसोबत खांद्याला खांदा लावून नगरसेवक करीत आहेत कर्तव्य


स्वच्छता कर्मचार्‍यांसोबत खांद्याला खांदा लावून नगरसेवक करीत आहेत कर्तव्य 

फवारणीसाठी नगर परिषद आरोग्य विभाग सरसावले 

      कारंजा (जनता परिषद) दि. ४ - कारंजा नगर परिषदचे आरोग्य विभाग हे कोव्हिड-१९ ह्या विषाणूचा नाश करणेसाठी शहरातील कान्याकोपर्‍यातून व गल्ली-गल्लींमधून सॅनीटाईजर फवारणी करीत असून नागरिकांचे आरोग्यासाठी काळजी घेत असल्याचे दिसून येते आहे. 

आरोग्य विभागाचे कर्मचारी जीवावर उदार होऊन करीत आहेत स्वच्छता 

   आरोग्य विभागाचे कर्मचारी हे आपल्या जीवावर उदार होऊन स्वच्छता करीत असून शहरातून नाल्या साफ करणे,  कचरा उचलणे, घंटागाडी द्वारे घर व प्रतिष्ठाणांचा कचरा गोळा करणे तसेच आता शक्य तेथे टॅक्टर द्वारे तर जेथे टॅक्टर पोहोचत नाही त्या ठिकाणी हातपंपा द्वारे सॅनिटाईजर फवारणी केली जात आहे. 

फवारणीसाठी नगरसेवक उतरले रस्त्यावर 

    विविध प्रभागातून नगरसेवक हे आपापल्या परिसरातील नागरिकांचे आरोग्याची काळजी घेतांना दिसून येत आहेत. स्वच्छता कर्मचार्‍यांसोबत खांद्याला खांदा लावून फवारणी करुन घेत आहेत तसेच कोठे घाण व कचरा दिसून आल्यास तो ही उचलण्याबाबत कामे केली जात आहेत.
       अशाप्रकारेच नगरसेवक नितीन गडवाले, अमोल अघम यांनी आरोग्य कर्मचारी व आपले कार्यकर्त्यांसह आपले प्रभागाची काळजी घेतांना फवारणी करवून घेतली. 
शहरातील प्रत्येक कानाकोपर्‍यात ह्या प्रकारे स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे असून पालिका म्हणून आपले पाल्य म्हणजेच शहरवासीयांचे आरोग्याची काळजी घेणे हे नगर पालिकेचे प्रथम कार्य असून ह्याची १००% अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यावेळी स्वच्छता विभागाचे कर्मचारी तसेच नगरसेवक यांचे जीवन फार मोलाचे असून त्यांचीही काळजी घेऊन त्यांनाही प्रशासनाने योग्य ते साधन देऊन त्यांना भरपूर प्रमाणात काळजी घेण्यासाठी निर्देश देणेही गरजेचे आहे. 

No comments

Powered by Blogger.