Header Ads

नगर परिषदने सुरु केली कारंजा-ई-मार्केट ची सुविधा

नगर परिषदने सुरु केली कारंजा-ई-मार्केट ची सुविधा 

जीवनावश्यक वस्तूच्या खरेदी करीता मोबाईल ऍप जारी 

ऍप द्वारा खरेदी केलेल्या वस्तूची घरपोच मिळणार 

कारंजा (का.प्र.) दि.२७ - कोरोनाचा प्रादुर्भाव हा संपर्कामुळे होत असल्याने व लॉकडाऊनचे काळात सकाळी ८ ते १२ दरम्यान विशेषत्वे जिवनावश्यक वस्तूंचे खरेदीसाठी नागरिक अक्षरश: झुंबळ करुन रोडवर उतरत असल्याचे सर्वत्रच दिसून येते आहे. 
कारंजा नगर परिषदने यावर मात करणेसाठी आजच्या मोबाईल व ई-माध्यमाचे वापराची अत्यंत स्तुत्य असा विचार समोर आणला असून त्याला मुर्त रुपही दिले आहे. आता कारंजेकरांना जिवनावश्यक वस्तू सरळ मोबाईल ऍप द्वारा मागविता येणार आहे आणि ते ही घरपोच. अशी माहिती कारंजाचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी दिली आहे. 
https://play.google.com/store/apps/details?id=km.rsservices.com.kem
कारंजा-ई-मार्केट karanja-e-market हे मोबाईल ऍप वापर करणार्‍या ग्राहक व विक्रेता यांच्यातील दुवा म्हणून काम करणार आहे. कोणत्याही मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरुन हे ऍप डाऊनलोड करता येणार आहे. भाजीपाला, किराणा-माल, डेअरी प्रॉडक्ट व मेडिकल यांचा यांत समावेश राहणार आहे. ऍपच्या माध्यमाने आपल्याला आवश्यक असणार्‍या सामानची यादी ग्राहक हा आपल्याला आवडेल त्या जवळच्या ऑनलाईन विक्रेत्याला देईल व विक्रेता त्याची घरपोच सेवा देणार आहे. विशेष म्हणजे यांत कॅश ऑन डिलीवरी म्हणजे सामान घरी आल्यावर पैसे देणे आहे त्यामुळे कोठेेच काही धोका होण्याचा संभव नाही. 
ऍपची सविस्तर माहिती व्यापार्‍यांना देणेसाठी नगर परिषद द्वारा एक बैठकही घेण्यात आली व याचे वापर करण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला. लॉकडाऊन चे या काळात घरातच रहा सुरक्षीत राहा तसेच या ऍपचा वापर करुन अनावश्यक गर्दी टाळा व आपली काळजी घ्या असे आवाहन यावेळी मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे सह उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर यांनी केले. 


No comments

Powered by Blogger.