Header Ads

जिल्हा कोरोनामुक्त झाले म्हणून गर्दी करु नका

जिल्हा कोरोनामुक्त झाले म्हणून गर्दी करु नका 

महानगरातून आलेल्यांची माहिती प्रशासनास द्यावी; अन्यथा कडक कारवाई 

तहसीलदार धीरज मांजरे यांचे नागरिकांना आवाहन 

     कारंजा (जनता परिषद) दि.२६ - वाशिम जिल्हा हे कोरोना मुक्त झाले आहे म्हणून नागरिकांनी जास्तच निश्‍चिंत होऊन गर्दी करु नये, असे आवाहन कारंजाचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या एका चित्रफीत द्वारे केले आहे. गर्दीमुळे संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो असेही ते म्हणाले. 
     दुकाने व प्रतिष्ठाणे उघडणेबाबतही अनेक नागरिक फोन द्वारे विचारणा करीत असून अद्याप पर्यंत तरी राज्य शासन किंवा जिल्हाधिकारी यांचे मार्फत असे कोणतेच आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे आता पर्यंत जी स्थिती आहे तीच कायम राहणार आहे.
महानगरातून आलेल्यांची माहिती प्रशासनास द्यावी; अन्यथा कडक कारवाई 
देशातील अनेक भागातून तसेच मुख्यत्वे मुंबई, पुणे व इतर महानगरातून काही नागरिक हे चोरट्या मार्गांनी शहरात व तालुक्यातील इतर गावांमध्ये येत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये कोणी कोरोनाने संसर्गीत असेल तर नक्कीच हे महागात पडू शकते व कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो अशी भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच याबाबत त्वरीत महसुल, पोलिस, नगर पालीका किंवा ग्राम पंचायत प्रशासनांस माहिती द्यावी जेणे करुन अशा लोकांची आरोग्य तपासरी करुन त्यांना १५ दिवसांसाठी विलगीकरणात ठेवता येऊ शकेल तसेच काही त्रास असल्यास उपचारही केले जाणे शक्य होेईल असेही ते म्हणाले. तसेच आपले घरी महानगरातून आलेल्या कोणाची माहिती लपविण्यात आली व त्यामुळे जर कां संसर्ग वाढला तर त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा ही तहसीलदार धिरज मांजरे यांनी दिला आहे. 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

Don't get crowded as the district is free of corona  

Give Info about people who came from Metro cities; otherwise, be ready for strict action 

Tehsildar Mr. Dheeraj Manjre's appeal to the citizens 


Karanja (Janata Parishad) Date 26th Apr - Washim district is free from Corona, so the citizens should not be too crowded, appealed Tehsildar Mr. Dheeraj Manjre of Karanja in a video addressed to the citizens.  Crowds can also increase the risk of infection, he said.  Many citizens are also inquiring by phone about opening shops and establishments and so far no such orders have been received from the state government or the district collector.  So the status quo will remain the same till now.
The administration should be informed about those who came from the metropolis;  otherwise, strict action will be taken against. Some citizens from many parts of the country, mainly from Mumbai, Pune, and other metros,  have come here by hook or crook into the city and other villages in the taluka.  He feared that if anyone was infected with the corona, it could be costly and the corona infection could increase.  He also said that the revenue, police, municipal or gram panchayat administrations should be informed immediately so that such people can be kept in isolation for 15 days after health check-up and treatment in case of any problem.  Also, the information of someone who came to the house from the metropolis was hidden and so if the infection gets increased because of him or her; will have to face the legal action.  Tehsildar Mr. Dhiraj Manjre has also warned that legal action will be taken against such people.

No comments

Powered by Blogger.