Header Ads

राज्य शासनाने मागितली केंद्राकडे पुल टेस्टींग ची मागणी

राज्य शासनाने मागितली केंद्राकडे पुल टेस्टींग ची मागणी 

          मुंबई दि.१२ - इस्त्राईल व अमेरिकाच्या धर्तीवर महाराष्ट्रात पुल टेस्टींग करण्याची परवानगी राज्य सरकारने केंद्र सरकार व आयसीएमआर कडे मागितली आहे. पुल टेस्टींगला मान्यता मिळाल्यास एकाच वेळी दहा नुमन्यांची तपासणी होणे शक्य होणार आहे. म्हणजेच १० पट तसापणी जास्त होऊ शकणार आहे. आजमितीला दिवसाला ४ ते ५ हजार टेस्टींग केले जात आहेत. 

रुग्ण संख्येनुसार जिल्ह्यांची तीन झोन मध्ये विभागणी 
राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी दिलेल्या एका माहितीनुसार राज्यात कोरोना रोगावर अंकुश लावणेसाठी सर्वतोपरी पर्याय शोधले जात असून शक्य ते सर्वच कार्य करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. याचाच एक भाग म्हणून राज्यातील जिल्ह्यांची विभागणी ही तीन झोन मध्ये करण्यात आली आहे. यानुसार १५ पेक्षा जास्त रुग्ण जेथे आढळून आलेले आहेत ते जिल्हे रेड झोन मध्ये तर त्यापेक्ष कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज झोन मध्ये ठेवण्यात येणार आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही त्याला ग्रिन झोन मध्ये ठेवण्यात आले आहे. 
लॉकडाऊन दरम्यान जे जिल्हे रेड झोन मध्ये आहेत, तेथे कोरोना रोगास थोपविणेसाठी अजून कडक पावले उचलली जाणार असून ऑरेंज व ग्रिन झोन मध्ये टप्प्याटप्प्याने उद्योग व व्यापार सुरु करण्यास परवानगी दिले जाण्याची शक्यता आहेे. 
रेड झोन : मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड सांगली, औरंगाबाद
ऑरेंज झोन : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोदिया
ग्रीन झोन : धुळे, नंदूरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली
रुग्णालयांचेही तीन भागात वर्गीकरण होणार 
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील रुग्णालयांचेही तीन भागात वर्गीकरण करण्यात येणार असल्याची माहिती असून १) फक्त लक्षण नसलेले कोरोना रुग्ण २) कमी लक्षण असलेले कोरोना रुग्ण ३) गंभीर कोविड रुग्ण अशा प्रकारे राहण्याची शक्यता आहे. 

No comments

Powered by Blogger.