Header Ads

राज्यात ३० एप्रील पर्यंत वाढले लॉकडाऊन


राज्यात ३० एप्रील पर्यंत वाढले लॉकडाऊन 

तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाददारी घेतो - मुख्यमंत्री 

मुंबई दि.११ - राज्यातील लॉकडाऊन हे ३० एप्रील पर्यंत कायम राहणार आहे, असे मुख्यमंत्री मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेशी फेसबूक वरुन संवाद साधतांना घोषीत केले आहे. तसेच हे युद्ध आपण लढणार व जिंकणार असा आत्मविश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. लॉकडाऊन त्यापुढे कधीपर्यंत राहील हे सर्वस्वी आमच्या व तुमच्या हातात असून  कोरोनाच्या विषाणूची साखळी तोडणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले.
लॉकडाऊन वाढविणेसह ज्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव खुप जास्त नाही अशा ठिकाणी काही अंशी शिथीलता देण्यात येऊ शकते. मात्र कोरोनाच्या रुग्णांची संख्या जास्त आढळून आल्यामुळे ज्या ठिकाणांना हॉटस्पॉट म्हणण्यात येत आहेत, तेथे आणखीन कठोर पावले उचलण्यात येतील असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. 
शाळा, विद्यापीठ परिक्षा, उद्योगधंदा यांच्या बाबतीत १४ एप्रील पर्यंत सांगण्यात येईल असेहंी ते म्हणाले.  
राज्यात अद्यापपावेतो ३३,००० पेक्षा जास्त चाचण्या झाल्या असून एकट्या मुंबईतच १९,००० चाचण्या घेण्यात आल्या आहेत. १००० पेक्षा जास्त रुग्ण सापडले असले तरी ६५ ते ७०% रुग्णांत अतिसौम्य लक्षणे आहेत, ही दिलासा दायक बाब असल्याचे ते म्हणाले. 
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा सुरळीत सुरु राहणार असून शेती विषयक कामे व शेतमाल वाहतूक ही बंद राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

No comments

Powered by Blogger.