Header Ads

कारंजा शहरात ३ सॅनिटायझेशन झोन

कारंजा शहरात ३ सॅनिटायझेशन झोन

तर ३ जागांवर हॅन्डवॉश सेंटर

कारंजा (जनता परिषद) दि.१२ - कारंजा नगर परिषदने कोरोना ह्या रोगाशी दोन-दोन हात करणेसाठी आपली आरोग्य यंत्रणा १००% कामावर लावली असून याद्वारे शहरातून विविध भागातून धुर फवारणी, सॅनीटायझेशन, कचरा गोळा करणे तसेच स्वच्छता राखण्याचे कार्य आरोग्य निरीक्षक विनय वानखडे यांच्या मार्गदर्शनात अत्यंत चोखपणे सुरु आहे. 

एक सॅनीटायझेशन झोन सुरु; दोन लवकरच सुरु होणार 

योग्य प्रकारे सॅनिटायझेशन शक्य व्हावे यासाठी सद्यस्थितीत ३ सॅनिटायझेशन झोन सुरु करण्यात येत असून यांतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील १ सॅनिटायझेशन झोन कार्यान्वित झाले असून बायपास येथील झोन उभारणी कार्य सुरु आहे तर तिसरे व सर्वात मोठे सॅनिटायझेशन झोन हे लवकरच जयस्तंभ चौक येथे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक विनय वानखडे यांनी दिली. तिन्ही जागांवरील प्रतिसाद पाहिल्यानंतर शहरातील आणखीन काही भागात असे झोन सुरु करण्यात येऊ शकतात, अशी माहितीही त्यांनी दिली. 
तसेच शहरात आंबेडकर चौक, शिवाजी चौक व महात्मा फुले चौक या भागांमध्ये हात धुणेसाठी तीन सॅनीटायझेशन हॅन्डवॉश सेंटर सुरु करण्यात आलेले आहे. 
कारंजा नगर परिषद स्वच्छता विभाग हे आपल्या परिने सर्व ते प्रयत्न करीत असून नागरिकांनीही शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश पालन करुन तसेच घरीच राहून व विनाकारण रस्त्यावर न येता प्रशासनास सहकार्य करुन ह्या रोगाला सर्वांनी मिळून हरविण्याचे कार्य करावे, असे आवाहन आरोग्य निरीक्षक विनय वानखडे यांनी केले आहे. 

No comments

Powered by Blogger.