Header Ads

हिवरा लाहे ग्रामस्थांनी तहसिलला दिले १० क्विंटल गहु


हिवरा लाहे ग्रामस्थांनी तहसिलला दिले १० क्विंटल गहु सरपंच सागर ढेरे यांच्या पुढाकाराने केले ग्रामस्थांनी जमा



कारंजा दि.18 - कोरोनाच्या ह्या महासंकटाचे काळात कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत वैयक्तिकरित्या व्यक्ती, संस्था, सामाजीक संघटन हे समोर येऊन मदत करीत असल्याचे सुखद दृष्य दिसून येते आहे. 
आज असाच एक आदर्श तालुक्यातील ग्राम हिवरा लाहेचे ग्रामस्थांनी आपले कृतीतून दाखवून दिला. सरंपच सागर ढेरे यांच्या प्रेरणेने व पुढाकाराने येथे सुमारे ३१ ग्रामस्थांनी १० ते ५० किलो गहु जमा करीत १० क्विंटल महू जमा केला. लॉकडाऊन दरम्यान बेघर तसेच तालुक्यात बाहेरुन आलेले मजूर यांना अन्नधान्य मिळावे यासाठी ह्याचा वापर केला जाणार आहे. 
सरपंच सागर अशोक ढेरे यांच्या मार्गदर्शनात तहसिलदार धिरज मांजरे यांचे सुपुर्द हे १० क्विंटल गहू करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार हरणे, पत्रकार प्रफुल्ल बाणगांवकर, अभय खेडकर, महेश धानोरकर, घाटे आदी उपस्थित होते. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.