Header Ads

कारंजा माहेश्‍वरी समाज मदतीसाठी सरसावले


कारंजा माहेश्‍वरी समाज मदतीसाठी सरसावले 

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला ५० हजार रुपयांचा रोख निधी 

कारंजा (जनता परिषद) दि.१९ - विपत्तीच्या क्षणी समाज, गांव व देशाचे मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असणारा माहेश्‍वरी समाज कोरोनाच्या या लढाईत समोर आला आहे. कोरोना विरोधातील या लढाईसाठी समाज बांधवांच्या वतीने मुख्‌यमंत्री सहाय्यता निधीला रोख ५० हजार रुपयांची सहायता राशी देण्याचे कारंजाचे माहेश्‍वरी समाज बांधवांचे झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. त्या अनुषंगाने कारंजाचे तहसीलदार धिरज मांजरे यांना ५० हजार रुपये रोख  देण्यात आले. यावेळी शेखर बंग, अशोक इन्नाणी, ललीत चांडक, मनीष साबू, दिलीप गिल्डा, गोपाल इन्नाणी, दिनेश मालाणी, धिरज बंग, रुपेश बाहेती तसेच तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते. 
संपूर्ण जग हे कोरोना ह्या न दिसणार्‍या मानवतेच्या शत्रुंच्या विळख्यात सापडलेले आहे. अशावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात या कठीण वाटेतून वाटचाल करण्याचा देश व राज्य प्रयत्न करतो आहे. त्यांचे हाकेला ओ देत माहेश्‍वरी समाज बांधव हे पुढे सरसावले. 
राज्यामध्ये सुरु असलेल्या महाभयंकर कोरोना संसर्गजन्य साथी रोगावर नियंत्रण करण्याकरीता राज्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये आपत्ती व व्यवस्थापन अधिनियम २००५ लागू झालेला आहे. त्या अनुषंगाने कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावात लॉकडाऊन कालावधीत बेघर, विस्थापीत कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार यांच्या साठी निवारागृह अन्नधान्य व भोजन व्यवस्थेबाबत ज्या स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, सहकारी संस्था, दानशूर व्यक्ती यांना अन्नधान्य व निधी स्वरुपात मदत द्यावयाची असेल त्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधून मदत करावी असे आवाहन कारंजाचे तहसीलदार धिरज मांजरे यांनी केले होते. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.